मुंबई - राज्यात 17 जिल्ह्यातील 608 ग्रामपंचायतचे निकाल ( Gram Panchayat Result ) हाती आले आहेत. या निकालात आपलाच पक्ष पुढे कसा हे सातत्याने भारतीय जनता पक्ष सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गट यांच्या युतीला ग्रामपंचायत सर्वात अधिक ग्रामपंचायत वर विजय झाला असल्याचा दावाही भाजप आणि एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाकडून करण्यात येतोय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारी पक्षाचा हा दावा खोडून काढला असून ग्रामपंचायत महाविकास आघाडीला सर्वात जास्त जागा मिळाल्या ( Great Success Of Mahavikas Aghadi ) असल्याचा दावा केला आहे. या निकालांमध्ये महाविकास आघाडीला 277 तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाला केवळ 210 जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने कौल दिला असल्याचा शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
दसरा मेळावाचा वाद सामंजस्याने सोडवावा -मुख्यमंत्री हे राज्याचे मुख्यमंत्री असतात ते स्वतःही अनेक वेळा दसरा मेळाव्यात शिवाजी पार्क येथे उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून भूमिका घेताना त्यांची भूमिका ही सामंजस्याची असली पाहिजे. दसरा मेळावा बाबतची पहिली मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. त्यामुळे या मागणीच्या निर्णयाला विलंब लावणे योग्य नाही. दसरा मेळाव्याचा प्रश्न सामंजस्याने सोडवावा असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवार यांनी दिला आहे. तसेच राज्यातील जनता सध्या अडचणीत आहे त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून राज्याचे धोरण एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट करावे ते धोरण तातडीने अमलात आणले गेले पाहिजे यासाठी एकनाथ शिंदे यांनी काम केले पाहिजे असेही शरद पवार यावेळी म्हणाले.