मुंबई - देशातील युवा पिढीला अधिक तंत्रकुशल, रोजगाराभिमुख, सृजनशील व सशक्त बनवण्याचा निर्धार करूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आंतरराष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने केले आहे. पवार यांनी एक ट्विट करून हे आवाहन केले आहे.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, " युवा पिढी ही देशाच्या विकासात मोलाची कामगिरी पार पाडत असते. युवावर्गाला रचनात्मक बळ दिल्यास त्यांच्या शक्तीची परिघ विकासाच्या नव्या परिसीमा गाठेल. आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त देशातील युवा पिढीला अधिक तंत्रकुशल, रोजगाराभिमुख, सृजनशील व सशक्त बनवण्याचा निर्धार करूया."