मुंबई - देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) आता गुजरातमध्ये हलवण्यात येणार आहे. याबद्दल केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
शरद पवारांचे मोदींना पत्र... IFSC केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय धक्कादायक ! - आयएफएससी केंद्र
महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनीच मुंबईतील बीकेसी येथे होणारे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरात राज्यातील गांधीनगरला हलवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता राज्यात महाविकासआघाडी विरुद्ध भाजप नेते यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत.
![शरद पवारांचे मोदींना पत्र... IFSC केंद्र गुजरातला हलवण्याचा निर्णय धक्कादायक ! Sharad Pawar Letter to PM](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7040492-thumbnail-3x2-aa.jpg)
'केंद्राचा हा निर्णय धक्कादायक आहे. मुंबईही देशाची आर्थिक राजधानी आहे. एकट्या मुंबईतून सर्वाधिक जास्त कर दिला जातो. एवढsच नाहीतर गुजरातपेक्षा महाराष्ट्र हा सर्वात जास्त निधी देणारे राज्य आहे. अशी परिस्थिती असतानाही मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईला नेणे योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी हा निर्णय रद्द करावा', अशी मागणी शरद पवारांनी पत्राद्वारे केली आहे.
पत्रात नेमकं काय म्हणाले आहेत पवार ?
केंद्राचा हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि नियोजनशून्य आहे. या निर्णयाने राजकीय तिढा निर्माण होईलच पण मुंबईतील केंद्र गांधीनगर येथे हलवणे यामुळे देशाचे अर्थकारण धोक्यात येईल, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा जास्त निधी देतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राचे मुख्यालय हे मुंबईतच असले पाहिजे, असेही पवारांनी म्हटले आहे.