मुंबई : महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) सरकारला सत्तेपासून खाली ( Down from power )खेचून राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिंदे यांचे सरकार स्थापन झाले आहे. मात्र, हे सरकार सहा महिन्यांमध्ये कोसळेल. त्यामुळे सर्व आमदार आणि नेत्यांनी मध्यवर्ती निवडणुकीच्या तयारीला ( Prepare for Midterm Elections ) लागा, अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत. शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आणि आमदारांची यशवंतराव चव्हाण सेंटर ( Meeting at Yashwantrao Chavan Center ) येथे सायंकाळी बैठक ( NCP meeting ) बोलावली होती. या बैठकीतून त्यांनी आपल्या नेत्यांना आणि आमदारांना या सूचना दिल्या आहेत.
कालच पार पडले विधिमंडळ विशेष अधिवेशन :नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर काल विधिमंडळ विशेष अधिवेशन पार पडले. त्यामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात आली. विधानसभा अध्यक्ष म्हणून भाजप व शिंदे गटाचे राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. महाविकास आघाडीच्या आमदारांनी या निवडणुकीला विरोध केला होता. राज्यपालांनी बोलावलेल्या या निवडणुकीवरच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आक्षेप घेतला होता. राज्यपालांच्या भूमिकेविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.