महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sharad Pawar counsel NCP MLA : शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना कानमंत्र, बैठकीला अपक्ष आमदारांची हजेरी

20 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ( Sharad Pawar counsel to NCP MLA in Mumbai ) सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. सर्वच पक्षांनी आपले ( Sharad Pawar meeting Trident Hotel Mumbai ) आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवून होणाऱ्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ( Sharad Pawar meet ncp mla Mumbai ) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या अपक्ष आमदारांची बैठक मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये घेतली.

Sharad Pawar
शरद पवार

By

Published : Jun 19, 2022, 6:48 AM IST

मुंबई - 20 जूनला होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ( Sharad Pawar counsel to NCP MLA in Mumbai ) सर्वच पक्षांनी आपली कंबर कसली आहे. सर्वच पक्षांनी आपले ( Sharad Pawar meeting Trident Hotel Mumbai ) आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवून होणाऱ्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी होईल याची रणनीती आखली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ( Sharad Pawar meet ncp mla Mumbai ) आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेल्या अपक्ष आमदारांची बैठक मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेत असलेले उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना विजयी करण्याबाबतच्या सूचना या बैठकीतून शरद पवार यांनी आपल्या सर्व आमदारांना दिल्या.

हेही वाचा -Rahul Gandhi defamation case: मानहानी खटल्याप्रकरणी राहुल गांधींना गैरहजर राहण्यास न्यायालयाची परवानगी

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार प्रफुल पटेल यांच्यासह सर्वात महत्त्वाचे नेते उपस्थित होते. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला अपक्ष आमदार देवेंद्र भुयार आणि संजय शिंदे हे देखील उपस्थित होते. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा झालेला पराभव लक्षात घेता विधानपरिषदेच्या निवडणुकीत आमदारांकडून मतदान करताना कोणतीही चूक होऊ नये. मतदान करताना कोणत्या दक्षता पाळाव्या त्याबाबतच्या सूचना या बैठकीतून आमदारांना देण्यात आल्या आहेत.

उद्या मुख्यमंत्र्यांसोबत होणार बैठक -महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून येतील याबाबत तिन्ही पक्ष सतर्क आहेत. मात्र, अद्याप विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडलेली नाही. मात्र, आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विधानपरिषदेच्या निवडणुकीबाबत अंतिम चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांची बैठक पार पडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. तसेच, विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे सहाही उमेदवार निवडून येतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -Aslam Shaikh : 'महाविकास आघाडीवर कोणीही आमदार नाराज नाही'

ABOUT THE AUTHOR

...view details