शरद पवार- मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील बैठक संपली; विधान परिषदेच्या जागा वाटपावरून खलबते - शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (सोमवार) दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या नियुक्तीसंदर्भात काही निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
![शरद पवार- मुख्यमंत्री ठाकरे यांच्यातील बैठक संपली; विधान परिषदेच्या जागा वाटपावरून खलबते Sharad Pawar CM meeting ended](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7721234-283-7721234-1592817541811.jpg)
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (सोमवार) दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत विधानपरिषदेच्या नियुक्तीसंदर्भात काही निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, गृहमंत्री अनिल देशमुख हेही उपस्थित होते. विधान परिषदेच्या जागेसोबतच राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसला विधानपरिषदेत जागा निश्चित असून, त्यापैकी एक जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मिळणार आहे. तर इतर तीन नावांवर आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असल्याचे सांगण्यात येते.