मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक आज बुधवार (दि. 2 मार्च)रोजी बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असून सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला अर्थमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित आहेत.
Today Meeting of NCP Ministers : शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विविध विषयांवर सखोल चर्चा - today' NCP ministers
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची बैठक आज बुधवार (दि. 2 मार्च)रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार आहे. (Today Meeting of NCP Ministers ) या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अर्थमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह सर्व मंत्री उपस्थित आहेत.
![Today Meeting of NCP Ministers : शरद पवारांनी बोलावलेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची विविध विषयांवर सखोल चर्चा शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-14612043-thumbnail-3x2-ncpmeeting.jpg)
मंत्र्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्या (दि. 3 मार्च)पासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होणार असून काँग्रेसकडून विधानसभा अध्यक्षसाठी नाव घोषीत केले जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनाही ईडीने अटक केली. यासोबतच मंत्री प्राजक्त तनपुरे यांची मालमत्ता देखील ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्र्यांवर होणाऱ्या कारवाईबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.