महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Andheri East by Election : अंधेरी पूर्व पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, शरद पवारांचे आवाहन

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध ( Andheri East Constituency Election Unopposed ) व्हावी अस आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( NCP senior leader Sharad Pawar ) यांनी केल आहे.

Sharad Pawar
शरद पवारां

By

Published : Oct 16, 2022, 6:53 PM IST

Updated : Oct 16, 2022, 7:40 PM IST

मुंबई - अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध ( Andheri East Constituency Election Unopposed ) व्हावी अस आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार ( NCP senior leader Sharad Pawar ) यांनी केल आहे. आमदार रमेश लटके ( MLA Ramesh Latke ) यांचं निधन झाल्यामुळे तेथे पोटनिवडणूक लागली. या पोटनिवडणुकीत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके ( Rituja Latke ) यांनी उमेदवारीचा अर्ज भरला आहे. दीड वर्षाच्या कालावधीसाठी ही निवडणूक होत असून, एवढ्या कमी कालावधीसाठी ही निवडणूक होऊ नये. ऋतुजा लटके यांना बिनविरोध निवडून द्यावं. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक चांगला संदेश जाईल असेही मत शरद पवार यांनी मुंबईत आपल्या निवासस्थानी पत्रकाची संवाद साधताना व्यक्त केला आहे.

शरद पवार

निवडणुक बिनविरोध व्हावी - भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे ( Gopinath Munde ) यांचेही अपघाती निधन झाल्या वेळेस त्या ठिकाणी कोणताही उमेदवार देऊ नये अशी भूमिका राष्ट्रवादीकडून आपण घेतली होती. याचीही आठवण शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला करून दिली.अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray ) भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार देण्यात आले आहेत. कोणीही निवडणूक प्रतिष्ठेची करू नये. अद्याप उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ गेलेली नाही. त्यामुळे अजूनही ही निवडणूक बिनविरोध होऊ शकते असं मत शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Maharashtra Navnirman Sena President Raj Thackeray ) यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र बाबत आपल्याला काहीही कल्पना नाही हे देखील स्पष्ट केल आहे.


मनपा ने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारायला हवा होता - आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र महानगरपालिकेने राजीनामा स्वीकारला नसल्यामुळे हे सर्व प्रकरण कोर्टात घेऊन जावं लागलं कोर्टाने फटकारल्यानंतर महानगरपालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला. मात्र यावर बोलताना शरद पवार म्हणाले की महानगरपालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारायला पाहिजे होता.


खेळामध्ये राजकारण नको -सध्या एमसीएची निवडणूक पार पडत असून सर्वपक्षीय नेतेमंडळी या निवडणुकीमध्ये एकत्रितरित्या पाहायला मिळत आहेत. यावर बोलतानाही शरद पवार म्हणाले की, खेळाच्या ठिकाणी राजकारण आणू नये या आधीही आपण एमसीए, बीसीसीआय, आयसीसी संघटनेचे अध्यक्ष पद भूषवले. आपण स्वतः बीसीसीआयचे अध्यक्ष असताना गुजरात क्रिकेट संघाचे अध्यक्ष आताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. एमसीएचे अध्यक्ष आशिष शेलार असताना त्यांनाही सहकार्य केलं त्यामुळे खेळाच्या ठिकाणी राजकारण आणू नये असा संदेश शरद पवार यांनी यावेळी दिला.

निवडणूक आयोगावर शंका होणार नाही याची काळजी आयोगानेही घेतली पाहिजे - हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्याच्या निवडणुका जाहीर होणार होत्या. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळ हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. मात्र, गुजरातच्या निवडणुका अद्याप जाहीर नाही. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाने सर्वांच्या निवडणुका सोबत घेतल्या असत्या तर निवडणूक आयोगावर ज्या शंका घेतल्या जात आहेत. त्या घेतल्या गेल्या नसत्या. निवडणूक आयोग स्वायत्त सस्था आहे. त्यामुळे त्याबद्दल शंका उपस्थित होऊ नये अशी अपेक्षा सर्वाची आहे. मात्र, ही काळजी निवडणूक आयोगाने देखील घेतली पाहिजे, असे पवार यावेळी म्हणाले.

Last Updated : Oct 16, 2022, 7:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details