मुंबई :राज्यसभा निवडणुकीमध्येमहाविकासआघाडीच्या चौथा उमेदवाराला पराभव पत्करावा लागला. महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असूनही शिवसेनेचा दुसरा आणि महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार पराभूत झाल्याने महाविकास आघाडीला हा मोठा झटका समजला जातोय. या पराभवबाबत चिंतन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार यांनी वापराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अपक्षांच्याबाबत काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
दिलबरो निवासस्थानी पार पडली बैठक : आज सकाळी दहा वाजता शरद पवार यांनी आपल्या "दिलबरो" या निवासस्थानी ही बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,मंत्री छगन भुजबळ, मंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड आणि नवनिर्वाचित खासदार प्रफुल पटेल हे उपस्थित होते. विधान परिषदेच्या निवडणुकीआधी लवकरच तिन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांची संयुक्त बैठकीबाबतदेखील या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.