कोल्हापूर- मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सरकारला कोणताही धोका नाही. आमचे सरकार मजबूत स्थितीत आहे, असे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना हिरेन मृत्यूप्रकरणी अटक केल्यानंतर सरकारच्या अडचणी वाढतील किंवा मंत्रिमंडळामध्ये काही फेरबदल होतील, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारला कुठलाही धोका नसल्याचे शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
हिरेन मृत्यूप्रकरणी सरकारला कोणताही धोका नाही संबंधित बातमीसचिन वाझे प्रकरणात नाना पटोले आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
अधिवेशनात विरोधकांना योग्य उत्तरे-
यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना आम्ही योग्य पद्धतीने उत्तर दिली आहेत. हा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे आहे. खरेतर विरोधक हे टीका करण्याचे काम करणारच आहेत. मात्र, त्यांच्या टिकेकडे लक्ष देण्याचे कारण नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
संबंधित बातमी वाचा-सचिन वाझे प्रकरणी भाजपच्या भूमिकेवर संशय, सत्य जनतेपुढे येऊ द्या - भाई जगताप
वाझे यांची नियुक्ती नियमानुसारच -
यापूर्वी निलंबन केलेल्या वाझे यांना कशी काय पुन्हा नियुक्ती केली असे, आयशा बेगम यांनी सवाल केले आहेत. यावर बोलताना शंभूराजे देसाई म्हणाले, 2020 साली सचिन वाझे यांची केलेली नियुक्ती ही नियमानुसारच केली आहे. कोणत्याही नियमांचे उल्लंघन करून त्यांची नेमणूक केली नाहीय. तसे नियमात असल्यामुळेच त्यांना नियुक्ती देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले. दरम्यान, वरुण सरदेसाई आणि सचिन वाझे यांचे कशा पद्धतीचे संबंध होते, त्यावर नितेश राणे यांनी केलेली टीका माहीत नाही, असेही शंभूराज देसाई म्हणाले.
मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक ठेवण्यात आलेल्या वाहनाप्रकरणी मुंबई पोलीस दलातील सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. या प्रकरणी भाजपने शिवसेनेवर आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे.
संबंधित बातमी वाचा-मनसुख हिरेन-वाझे प्रकरण : काय घडले आज दिवसभरात?
वाझे कुटुंबीयांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका -
एनआयएने सचिन वाझेंना केलेली अटक बेकायदेशीर आहे, असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात हेबियास कॉर्पस याचिका दाखल करण्यात आली आहे. सचिन वाझे यांचे बंधू सुधर्म वाझे यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.