महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 25, 2021, 1:32 PM IST

ETV Bharat / city

Shakti Mill Gang Rape Case :  काय आहे शक्ती मिल प्रकरण ?

बहुचर्चित शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणात (Shakti Mill Gang Rape Case) अखेर तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करीत उच्च न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया काय आहे शक्ती मिल प्रकरण (Shakti Mill Gang Rape Case)....

Shakti Mill Gang Rape Case
शक्ती मिल प्रकरण

मुंबई - बहुचर्चित शक्तीमिल सामूहिक बलात्कार प्रकरणात (Shakti Mill Gang Rape Case) अखेर तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करीत उच्च न्यायालयाने (Bombay high court) त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अतिशय गाजलेल्या अशा या प्रकरणात आरोपींची शिक्षा कमी करू नये यासाठी राज्य सरकारने आपली बाजू मांडली होती. नेमकं हे शक्ती मिल प्रकरण (Shakti Mill Gang Rape Case) काय आहे जाणून घेऊया

कुठे आहे शक्ती मिल ?
मुंबईतील महालक्ष्मी सातरस्ता या परिसरात शक्ती मिल आहे. गिरणी कामगारांच्या झालेल्या संपानंतर गेल्या अनेक वर्षांपासून ही मिल पूर्णतः बंद आहे. रेल्वे रुळांना लागून ही मिल असल्याने रेल्वे रुळांवरून काही नशेखोर तरुण सातत्याने या जागेचा वापर नशा करण्यासाठी करीत होते. या दरम्यान या परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नशेखोर तरुणांनी व्यसनांसोबतच चोरी करणे आणि एकट्या-दुकट्या महिलांची छेड काढणे त्यांचा विनयभंग करणे हे प्रकार सुरू केले होते.

२२ ऑगस्ट २०१३ चा तो काळा दिवस
आपल्या पत्रकार मित्रासोबत बातमी संकलित करण्यासाठी गेलेल्या एका महिला छायाचित्रकाराला या टोळक्याचा सामना करावा लागला. 22 ऑगस्ट 2013 ची ही घटना आहे. वृत्तांकन करीत असलेल्या या दोघांना पाच जणांनी आपण पोलिस असल्याची बतावणी करीत पकडले. पत्रकाराला मारहाण करून बांधून ठेवण्यात आले तर महिला पत्रकारावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. दोघांनाही मारहाण करण्यात आली आणि बांधून ठेवण्यात आले. घटनेच्या दोन तासानंतर दोघांनी कशीबशी स्वतःची सुटका केली आणि जीव वाचवून पळाले त्यानंतर जखमी अवस्थेत महिला पत्रकाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेची खबर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवली आणि पोलिसही या घटनेने सुन्न झाले.

७२ तासात पोलीसांनी केली आरोपींना अटक
या प्रकरणाने मुंबईमध्ये अतिशय खळबळ माजली. सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरू झाल्याने पोलिसांवर दबावाला तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी जातीने लक्ष घालून या प्रकरणातील आरोपींना 72 तासात बेड्या ठोकण्यात यश मिळवलं. चौकशीच्या दरम्यान या पाच जणांनी अशा पद्धतीने आणखी एक सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं. शक्ती मिलमध्ये यातील तीन आरोपींनी यापूर्वीही अशाच पद्धतीने बलात्कार केला होता. कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या एका महिलेनं पुढे येऊन याबाबतची माहिती दिली ही घटना ३१ जुलै २०१३ रोजी घडली होती.

पॉर्न फिल्म पाहून करत होते अत्याचार
पकडलेल्या आरोपींनी पोलिसांना सांगितले की पॉर्न फिल्म पाहून ते अशी कृत्ये करत होते. मदनपुरा, भायखळा आणि आग्रीपाडा या या परिसरात नेहमीच ते पॉर्न फिल्म पाहायला जात होते. त्यानंतर वेश्यावस्तीत त्यांचं येणं जाणं होतं. यात आरोपी विजय जाधव कासिम बंगाली आणि एक अल्पवयीन आरोपी यांचा समावेश होता. यातील अल्पवयीन असलेला आरोपी बलात्कारानंतर आपल्या घरी जाऊन पावभाजी खाऊन शांतपणे झोपी गेल्याचे निदर्शनास आले होते.

हेही वाचा -न्यायालयाने फरार घोषीत केलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मुंबईत परतले


तीन आरोपींना फाशी एकाला जन्मठेप
या प्रकरणातील पाच आरोपींपैकी तिघांना फाशीची शिक्षा सत्र न्यायालयाने सुनावली. तर एक आरोपी आधीच जन्मठेप भोगत होता पाचवा अल्पवयीन आरोपी असल्याने त्याला बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. ही शिक्षा सुनावताना गृहमंत्री आर आर पाटील स्वतः न्यायालयात हजर होते.

पण तो सुधारला नाही
अल्पवयीन आरोपी आकाश जाधव याला नाशिकचा बालसुधारगृहात तीन वर्षासाठी पाठवण्यात आले होते तीन वर्षानंतर त्याची सुटका झाली आणि तो बाहेर आला मात्र तो सुधारला नाही. काही महिन्यांपूर्वीच पुन्हा एकदा त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली एका व्यक्तीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता.

तिघांना जन्मठेप
दरम्यान, फाशीची शिक्षा रद्द करावी अशी मागणी या प्रकरणातील तीन आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. याबाबत आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने या तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करीत त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. देशभर गाजलेल्या या प्रकरणातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी यासाठी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडण्यात आली. मात्र त्याला यश आले नाही.

हेही वाचा -Shakti Mill Gang Rape Case : अपील केलेल्या आरोपींना दिलासा; फाशीची शिक्षा रद्द

ABOUT THE AUTHOR

...view details