महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शाहरुख खानच्या वाहन चालकाला 'एनसीबी'चे समन्स, चालक चौकशीसाठी कार्यालयात हजर

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान अमली पदार्थ प्रकरणात एनसीबीच्या कचाट्यात आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. एनसबीने आता आर्यन खानला क्रूझ पार्टीसाठी सोडणाऱ्या शाहरुख खानच्या वाहन चालकाला समन्स पाठवले आहे. तो चालक सध्या एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर असल्याची माहिती मिळत आहे.

शाहरुख खान
शाहरुख खान

By

Published : Oct 9, 2021, 5:18 PM IST

Updated : Oct 9, 2021, 6:20 PM IST

मुंबई- अंमली पदार्थ नियंत्रण विभाग (नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो) ड्रग्स पार्टी प्रकरणात मोठ्या जलदगतीने चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहे. आता एनसीबीने शाहरुख खानचा ड्रायव्हरला चौकशीसाठी समन्स बजावले होते. शाहरुख खानचा ड्रायव्हर आर मिश्रा एनसीबी कार्यलयात उपस्थित असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

शाहरुख खानचे निवासस्थान

चालकाने आर्यनला सोडले होते पार्टीच्या ठिकाणी

मुंबई ते गोवा जाणाऱ्या कार्डीला क्रूझवर ड्रग्स पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) दोन ऑक्टोबरला रात्री धाड टाकून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांसह आठ जणांना अटक केली. त्यांना शुक्रवारी (दि. 8 ऑक्टोबर) न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर हे सर्व आरोपी आता आर्थर रोड जेलमध्ये आहे. आज सकाळी अंमली पदार्थ प्रकरणात एनसीबीकडून शाहरुख खानच्या ड्रायव्हरला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. शाहरुख खानचा ड्रायव्हर आर मिश्रा एनसीबी कार्यलयात उपस्थित असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझ पार्टीला जाण्यासाठी याच ड्रायव्हरने आर्यन खान व त्याच्या मित्राला सोडले होते. अरबाजजवळ अंमली पदार्थ सापडले होते. काही गोष्टींच्या स्पष्टीकरणासाठी एनसीबीकडून ड्रायव्हरची चौकशी करण्यात येत आहे.

ठोस पुराव्या अभावी पाच लोकांना सोडले - एनसीबी

क्रुझवर झालेल्या कारवाईनंतर काहींना भाजप नेत्यांच्या फोननंतर एनसीबीने सोडून दिले, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एनसीबीवर केला होता. नवाब मालिकांचा आरोपानंतर काही तासातच एनसीबीने पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा केला आहे. एनसीबी एक निःपक्ष केंद्रीय संस्था आहे. एनसीबीच्या विरोधात करण्यात आलेले सर्व आरोप चुकीचे आणि निराधार आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, 2 ऑक्टोबर, 2021 रोजी कार्डीला द क्रुझवर रात्री आम्ही छापा टाकला होता. या कारवाईत शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह एकूण 14 जणांना क्रुझवरुन ताब्यात घेतले होते. या सर्व आरोपीना एनसीबी कार्यलयात आणून आम्ही कसून चौकशी केली आणि त्याच्या जबाब नोंदविण्यात आला आहे. चौकशीनंतर ताब्यात असलेल्या 14 पैकी 8 जणांना अटक केली आणि ठोस पुराव्या अभावी पाच लोकांना सोडून देण्यात आल्याची माहिती आज एनसीबीने आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

हेही वाचा -क्रुझवरील पार्टीतून पकडलेल्या भाजप नेत्याच्या मेहुण्याला व दोन मित्रांना सोडण्यासाठी फोन, NCB चे कॉल रेकॉर्ड तपासा - नवाब मलिक

Last Updated : Oct 9, 2021, 6:20 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details