मुंबई- बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान यांचा मुलगा आर्यन खान गेल्या सहा दिवसापासून आर्थर रोड कारागृहात आहे. 8 ऑक्टोंबर 2021 रोजी आर्यनला कारागृहात आणले होते. कारागृहात असलेल्या आर्यनची परिस्थिती अत्यंत नाजूक असून त्याचे मोठं हाल होत असल्याची माहिती समोर येत आहे. आर्यन कारागृहात आल्यापासून त्याने जेवण आणि अंघोळ केलेली नाही. आर्यन फक्त कॅन्टींगमधील विकत घेतलेले पारले जी बिस्कीट खात आहे. यामुळे आर्यनचे पोट साफ होत नसल्याने आर्यनची प्रकृती बिघडण्याची चिंता आर्थर रोड कारागृहातील कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
शाहरुख खानच्या मुलाचे कारागृहात हाल; आर्यन खानची प्रकृती बिघडण्याची चिंता! - आर्यन खानच्या पोटाची काळजी जनतेला
गेल्या सहा दिवसात आर्यन खानने जेवण केलेले नाही. फक्त पाणी आणि बिस्किटवर तो दिवस काढत आहे. कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी आर्यनला सतत समजावून सांगत आहेत. तसेच कारागृह कर्मचाऱ्यांकडून त्याला जेवण करण्याचाही आग्रहही धरला जात आहे. मात्र, आर्यन खान म्हणतोय की, "मला भूक नाही". आज सकाळी कारागृहातील एका शिपायाने आर्यनला कॅन्टींगमधून पारलेजी बिस्कीट आणून दिले आहे. आर्यन जवळ आता फक्त 3 बाटल्या पाणी शिल्लक आहे.
आर्यन म्हणतोय, "मला भूक नाही-
अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्स प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली आहे. त्यानंतर न्यायालयाने आर्यन खानला 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानुसार, आता आर्यन खान मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आहे. मात्र, गेल्या सहा दिवसात आर्यन खानने जेवण केलेले नाही. फक्त पाणी आणि बिस्किटवर तो दिवस काढत आहे. कारागृहातील अधिकारी आणि कर्मचारी आर्यनला सतत समजावून सांगत आहेत. तसेच कारागृह कर्मचाऱ्यांकडून त्याला जेवण करण्याचाही आग्रहही धरला जात आहे. मात्र, आर्यन खान म्हणतोय की, "मला भूक नाही". आज सकाळी कारागृहातील एका शिपायाने आर्यनला कॅन्टींगमधून पारलेजी बिस्कीट आणून दिले आहे. आर्यन जवळ आता फक्त 3 बाटल्या पाणी शिल्क आहे. आर्यन कारागृहात येत असताना पाण्याच्या 12 बॉटल घेऊन आलेला होता. मात्र, यातून फक्त 3 बाटल्या शिल्लक राहिल्या आहेत.
अडीच हजार रुपये बाळगण्याची अनुमती-
आर्थर रोड कारागृहाचा नियमानुसार, एका कैद्याला कारागृहात जात असताना फक्त अडीच हजार रुपये घेऊन जाता येते. कैद्यांकडे असलेले हे पैसे कारागृहातील खात्यातमध्ये जमा होते. त्यानंतर एका महिन्याकरिता त्यांना सामान खरेदी करायला कुपन दिले जाते. या कुपनाच्या माध्यमातून ते कारागृहातमध्ये असलेल्या कॅन्टींग मधून साबन, तेल टूथपेस्ट सारख्या वस्तू खरेदी करू शकतात. यासोबतच कारागृहातील कॅन्टीनमध्ये नमकीन बिस्कीट आणि चिप्स सारखे खाद्यपदार्थ सुद्धा विकत घेऊ शकतात.
आर्यनची प्रकृति बिघडण्याची चिंता-
कारागृहातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यन खानचे गेल्या तीन-चार दिवसापासून पोट साफ झालेलं नाही. आर्यन आतापर्यत टॉयलेटला गेला नाही, म्हणून कारागृहातील अधिकारी चिंतित पडले आहे. कारण आर्यन खानची प्रकृती यामुळें बिघडू शकते. कारागृहातील कर्मचारी आणि अधिकारी आर्य समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आर्यन खान ऐकायला तयार नाही. तसेच आर्यन गेल्या चार दिवसापासून आंघोळ सुद्धा केलेली नसल्याची माहिती समोर येत आहे. आर्यनबरोबर अरबाजला पण एकाच सेलमध्ये ठेवले आहे. आर्यनच्या घरून दोन चादर आणि काही कपडेही आले आहेत, अशी माहिती समोर येत आहे.
हेही वाचा - महात्मा गांधींच्या सूचनेवरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती - राजनाथ सिंह