महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अभिनेता शाहरुखने घेतली वकीलांची भेट - etvg bharat maharashtra

मुलाला सोडवण्यासाठी शाहरुखने तीन दिग्गज वकीलांची फौज न्यायालयात उभी केली होती. त्यात ज्येष्ठ अॅड विधीज्ञ मुकुल रोहतगी, अमित देसाई, अॅड. सतीश मानशिंदे यांनी भक्कम युक्तीवाद केला. त्यामुळेच आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. याची दखल घेत अभिनेता शाहरुखने तातडीने वकीलांची भेट घेतली. या सर्वांचे त्याने आभार मानले.

Shahrukh khan meet lawyers
Shahrukh khan meet lawyers

By

Published : Oct 28, 2021, 10:28 PM IST

मुंबई -पुत्र आर्यन खानला तब्बल २५ दिवसांनंतर जामीन मिळाल्याने अभिनेता शाहरुख खानचा जीव भांड्यात पडला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गुरूवारी झालेल्या सुनावणीत आर्यन खानसह त्याच्या दोन मित्रांना जामीन मंजूर केला आहे.

यासाठी शाहरुखने तीन दिग्गज वकीलांची फौज न्यायालयात उभी केली होती. त्यात ज्येष्ठ अॅड विधीज्ञ मुकुल रोहतगी, अमित देसाई, अॅड. सतीश मानशिंदे यांनी भक्कम युक्तीवाद केला. त्यामुळेच आर्यनला जामीन मंजूर झाला आहे. याची दखल घेत अभिनेता शाहरुखने तातडीने वकीलांची भेट घेतली. या सर्वांचे त्याने आभार मानले. या विधीज्ञांमुळेच आर्यनची दिवाळी तुरुंगाऐवजी घरात साजरी होणार आहे.

शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सविस्तर आदेश
न्यायमूर्ती सांबरे म्हणाले, "तिन्ही अपील स्वीकारल्या आहे. मी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सविस्तर आदेश देईन." त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी रोख जामीन मंजूर करण्याची परवानगी मागितली. जी न्यायालयाने नाकारली आणि जामीन द्यावा लागेल असे सांगितले. न्यायमूर्ती सांबरे म्हणाले, मी शुक्रवारी आदेश देऊ शकलो असतो, पण आज दिला.

हेही वाचा -समीर वानखेडेंच्या जात प्रमाणपत्रावरून सुरू आहे वाद, जाणून घ्या, कागदपत्रात छेडछाड केल्यास काय होते कारवाई

ABOUT THE AUTHOR

...view details