मुंबई- कॉर्डींया द क्रूझच्या ड्रग्स पार्टी प्रकरणी न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत सुनावली आहे. मात्र, या सगळ्या प्रकरणात आर्यन खानला कोर्टाच्या बाहेर अरबाज मर्चंटचे वडील भेटले. त्यांनी आर्यनला 'तुला घरचं जेवण आणून देऊ का?' असा प्रश्न विचारला. त्यावर आर्यनने नको थँक्स असं उत्तर दिले आहे.
7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडी-
मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या एका क्रुझ शिपवरील हायप्रोफाईल ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने शनिवारी रात्रीच्या सुमारास कारवाई करत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले होते. या कारवाईत तीन महिलांसह एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. त्यानंतर, रविवारी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना काला किल्ला कोर्टात हरज करण्यात आले होते. शाहरुख खानचा मुलाची केस अॅड. सतीश माने-शिंदे हे लढत आहेत. काल अॅड. माने हे किल्ला कोर्टमध्ये आर्यनची बाजू मांडली होती. तसेच जामीन अर्ज सुद्धा करण्यात आलेला होता. मात्र, कोर्टाने आज जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे. तसेच आर्यन खानसह अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत सुनावली आहे. मात्र आजच्या सगळ्या प्रकरणात एक घटना समोर आली, ज्यात आर्यन खानने घरी तयार केलेलं जेवण नाकारले आहे.
आर्यनने जेवण नाकारले -
जे जे रुग्णालयात मेडिकल टेस्ट केल्यानंतर एनसीबीने आर्यन खान, अरबाझ सेठ मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना किल्ला कोर्टात आज हजर करण्यात आले होते. यादरम्यान अरबाझ मर्चंटचे वडील सुद्धा न्यायालयात हजर होते. त्यांनी अरबाझसाठी घरचे जेवण आणले होते. तेव्हा त्यांनी आर्यनला सुद्धा विचारले की, तुला घरचं जेवण आणून देऊ का? त्यावर आर्यनने नको थँक्स असं उत्तर अरबाजच्या वडिलांना दिले. त्यानंतर त्यांनी अरबाजला जेवण दिलं. तो कॉरिडॉरमध्ये बसून खात होता, मात्र शाहरूखच्या मुलाने म्हणजेच आर्यनने घरी तयार केलेलं जेवण नाकारले आहे.