मुंबई -मुंबईत भाऊ आणि बहिणीच्या नात्याला काळिमा फासल्याची घटना समोर आली आहे. लहान भावाला अश्लील व्हिडिओ दाखवून बहिणीने लैंगिक संबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे. लहान वयात लैंगिक शिक्षण किती महत्वाचे आहे, हे या घटनेतुन समोर आले आहे.
मुंबईतील 'त्या' घटनेनंतर मानसोपचार तज्ज्ञाचे मत काय आहे प्रकार ?
मुंबईतील कुरार भागात लहान मुलांबाबत एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित १६ वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ पाहण्याचे व्यसन होते. दरम्यान ती आपल्या मोबाइलवर १३ वर्षीय भावाला झोपताना अश्लील व्हिडिओ दाखवायची. त्यानंतर ती आपल्या भावाबरोबर लैंगिक संबंध ठेवायची. मागील बऱ्याच दिवसांपासून हा संतापजनक प्रकार सुरू होता. संबंधित घटनेतून अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे. गर्भवती राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी संबंधित भावाची चौकशी केल्यानंतर संबंधित मुलगी खरे बोलत असल्याची माहिती उघड झाली. संबंधित भाऊ आणि बहिणीचा जबाब नोंदवून घेतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडित अल्पवयीन भावाला बाल सुधारगृहात पाठवले आहे. तर संबंधित तरुणी सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे. ही धक्कादायक बातमी ऐकल्यावर सगळ्यांचेच मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा लैंगिक शिक्षण किती महत्वाचे आहे, ही बाब प्रामुख्याने समोर येत आहे. लैंगिक शिक्षण हा आपल्याकडे दुर्लक्षित राहिलेल्या विषयांपैकी एक आहे. लहान मुलांना लैंगिक गोष्टींविषयी माहिती देणे तर दूरच पण या गोष्टींचा उल्लेखही अनेक कुटुंबांमध्ये निषेद्ध मानला जातो. मात्र, यामुळेच अलीकडच्या काळात बालवयातील मुलांच्या अनेक दुर्घटना घडत आहेत.
लहान वयापासूनच पालकांनी मुलांना हळूहळू लैंगिक गोष्टींबद्दल सांगायला सुरुवात केली पाहिजे. जेणेकरून मुलगा किंवा मुलगी एकदम मोठ्या वयात पोहोचल्यानंतर याविषयी त्यांच्यावर गंभीरपणे बोलण्याची वेळ येणार नाही. कारण या वयापर्यंत मुलांनी आपल्या मित्रांकडून किंवा इतर माध्यमातून लैंगिकतेबद्दल अनेक गोष्टी ऐकलेल्या असतात. त्यामुळे मुले पालकांकडून काही नवीन ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लहान मुलांशी लैंगिकता किंवा शरीरसंबंध या गोष्टींबाबत बोलाल, तेव्हा त्यांना समजेल आणि झेपेले अशा भाषेत पालकांनी बोलणे गरजेचे असते. मात्र, प्रत्येक मुलगा किंवा मुलीची समज ही वेगवेगळी असते, ही गोष्ट पालकांनी कायम ध्यानात ठेवला पाहिजे, असे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शैलेश उमाटे यांचे आहे.
हेही वाचा -राज ठाकरेंनी घेतली कविता पिंपळेंची भेट; अवैध फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासंबंधी केली पोलिसांशी चर्चा