मीरा भाईंदर (मुंबई)-भाईंदर पूर्वेच्या नवघर पोलीस ठाणे हद्दीत एका सहा वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केल्याबाबत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २२ वर्षीय नाराधामला पोलिसांनी अटक करून ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले आहे. न्यालयाने त्याला मंगळवार २८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी हा शेजारी असल्याची माहिती पुढे आली आहे.
डोंबिवलीची घटना ताजी
डोंबिवलीतील सामूहिक बलात्काराची घटना ताजी आहे. या घटनेत २३ आरोपींना अटक झाली आहे. याप्रकरणी दोषी आरोपींना अटक करण्याच्या सूचना पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. अशा प्रकारच्या घृणास्पद घटना घडू नये, यासाठी दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशा लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा -महंत नरेंद्र गिरींच्या मृत्यूप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा दाखल; तपासाला केली सुरुवात