मुंबई - मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा आणि अँटिलिया कार स्फोटक प्रकरणाचा तपास एनआयए करत आहे. या दोन्ही घटनांचा परस्परांशी संबंध आहे. या दोन्ही प्रकरणात अनेक आलिशान गाड्या वापरण्यात आल्या होत्या. 7 गाड्या आतापर्यंत एनआयएने ताब्यात घेतल्या आहेत, तर आठवी गाडी एनआयएच्या रडारवर आहे. नेमक्या या गाड्या आहेत तरी कोणत्या पाहुयात...
हेही वाचा -'या' कारणांमुळे झाली मनसुख हिरेनची हत्या ; एनआयएचा दावा
- गाडी क्रमांक 1 स्कॉर्पिओ
25 फेब्रुवारी रोजी एक स्कॉर्पिओ गाडी अंबानी यांच्या घराबाहेर सापडली आणि खळबळ उडाली. गाडी सुरुवातीला एटीएसने ताब्यात घेतली. मात्र, तपासात या गाडीचा नंबर प्लेट बनावट असल्याचे समोर आले. मात्र गाडीच्या काचेवर एक नंबर लिहिला होता आणि त्यावरून ती गाडी डॉक्टर सॅम न्यूटन यांची असल्याचे समोर आले .गाडीच्या मालकाचा शोध घेतला असता गाडीच्या मालकाने काही आर्थिक व्यवहारात ही गाडी मनसुख हिरेन नावाच्या व्यक्तीला दिली होती. त्यानंतर मनसुख हिरेन यांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर येथे सापडला. मनसुख हिरेन यांचा खून सचिन वाझे याने केला असावा अशी तक्रार मनसुख हिरेन यांच्या पत्नी यांनी दिली. तसेच प्रकरणात वापरलेली स्कॉर्पिओ हे सचिन वाझे चालवत होते अशीही माहिती हिरेन यांच्या पत्नीने पोलिसांना दिली. मात्र, एटीएसच्या तपासात वाझेने मी स्कॉर्पिओ वापरली नाही असे सांगितले होते.
- गाडी क्रमांक 2 इनोव्हा -
या सगळ्या प्रकरणात एक सीसीटीव्ही समोर आला. त्यात मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्कॉर्पिओ गाडीच्या मागे एक इनोव्हा उभी होती आणि ही इनोव्हा सीआययुच्या पथकातली असल्याचा संशय होता. तपासाची चक्रे फिरली आणि मुंबई पोलीस आयुक्तालयातून एक सफेद रंगाची इनोव्हा गाडी ताब्यात घेण्यात आली. या गाडीचा तपास यंत्रणेमार्फत तपासणीही केली. काही नमुने फॉरेन्सिक विभागाकडे पाठवण्यात आले. घटनेच्या दिवशी याच गाडीतून वाझेने पांढरा कुर्ता घालून प्रवास केला होता.
- गाडी नंबर 3 मर्सिडीज
या संपूर्ण वाझे पुराणात एक महागडी मर्सिडीज कारसमोर येत आहे. सीएसटी स्थानक परिसरातून 16 मार्च रोजी ही गाडी ताब्यात घेतली जाते. एनआयए या गाडीची कसून तपासणी करते, त्यावेळेस या ब्लॅक रंगाच्या मर्सिडीज कारमधून एक पैसे मोजण्याचे मशीन, पाच लाखापेक्षा जास्त रोख रक्कम, नंबर प्लेट आणि काही कपडे जप्त केले जातात. अशी माहिती एनआयएचे आयजी अनिल शुक्ला यांनी दिली होती. सध्या ही गाडी एनआयए कॅम्पसमध्ये आहे.
- गाडी क्रमांक 4 प्राडो