मुंबई- मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने मंगळवारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी ( Dawood Ibrahims D Company ) संबंधित पाच जणांना अटक केली आहे. हॉटेल व्यवसायिकाला धमकी देऊन खंडणी मागितल्या प्रकरणात यापूर्वी आणखी दोन आरोपींना अटक करण्यात ( demanding extortion arrest in Mumbai ) आले होते. या आरोपींना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टात मंगळवारी हजर करण्यात आले होते. त्यावेळी आज अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 18 ऑक्टोंबरपर्यंत तर पहिले अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना 15 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडून ( Mumbai police extortion case arrest ) अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी असे सांगण्यात आले की या सर्व आरोपींकडून या प्रकरणात तपास करणे आवश्यक आहे. तसेच या सर्व आरोपींचे कनेक्शन हे डी कंपनीची लिंक असल्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास अद्यापही बाकी आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना सात दिवसाची ( government prosecutors in the special court ) पोलीस कस्टडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून विशेष न्यायालयात करण्यात आली होती.
दाऊद इब्राहिम संबंध प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सात आरोपींना पोलीस कोठडी - गुन्हे शाखा खंडणी अटक
मुंबई पोलिसांकडून ( Mumbai police extortion case arrest ) अटक करण्यात आलेल्या या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी असे सांगण्यात आले की या सर्व आरोपींकडून या प्रकरणात तपास करणे आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना सात दिवसाची ( government prosecutors in the special court ) पोलीस कस्टडी देण्यात यावी, अशी मागणी सरकारी वकिलांकडून विशेष न्यायालयात करण्यात आली होती.
दोन आरोपींना 15 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी-आरोपीच्या वकिलांकडून असा युक्तिवाद करण्यात आला की या प्रकरणात पूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा राईट हॅन्ड छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला विनाकारण अनेक प्रकरणात अडकवण्यात येत आहे. तसेच दुसरा आरोपी रियाज भाटी यांना यापूर्वी अटक केली असल्याने त्याच्याकडून चौकशी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. दोन्हीही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने या प्रकरणात आज अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना 18 ऑक्टोबरपर्यंत तर या पहिले अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींना 15 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मुंबईतले सक्रिय सदस्य मुंबई पोलिसांच्या रडारवरमुंबई पोलिसांनी मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीशी संबंधित पाच जणांना अटक केली आहे. खंडणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दाऊदचा जवळचा गँगस्टर छोटा शकील आणि रियाज भाटी या सलीम फ्रूटला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून दाऊद टोळीतील मुंबईतले सक्रिय सदस्य मुंबई पोलिसांच्या रडारवर होते. अजय गोसारिया, फीरोज चमडा, समीर खान,अमजद रेडकर आणि यासह आणखी एका आणखी दाऊद टोळी संबांधित व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.