महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम; वेळापत्रक जाहीर! - मुंबई विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम बातमी

सेतू अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी शिक्षकांनी घेतलेल्या विषयनिहाय पूर्व चाचणीतून विद्यार्थ्यांच्या क्षमता संपादित होतील. त्यानंतर शालेय स्तरावर ३० दिवसांमध्ये काटेकोरपणे सेतूची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आढावा घेण्यात येणार आहे.

setu course for students of 2nd to 10th standard time table is declared
दुसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना सेतू अभ्यासक्रम

By

Published : Jun 12, 2022, 7:22 PM IST

मुंबई -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरू झाल्या नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना इयत्तानिहा आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून ‘सेतू’ अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या ‘सेतू’ उपक्रमाचे वेळापत्रक परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे.

असे आहे वेळापत्रक -मराठी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी असलेला हा सेतू उपक्रम विद्यार्थीकेंद्रित, कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहे. विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आढावा घेण्यासाठी सेतू उपक्रमाचे वेळापत्रक परिषदेकडून जाहीर करण्यात आले आहे. शाळा सुरू झाल्यानंतर १७ ते १८ जून २०२२ रोजी पूर्व चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर २० जून ते २३ जुलैपर्यंत ३० दिवसांचा सेतू अभ्यास दिला जाणार आहे. या अभ्यास झाल्यानंतर २५ आणि २६ जुलैला विद्यार्थ्यांची उत्तर चाचणी घेण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांच्या क्षमता संपादित होतील -हा सेतू अभ्यासक्रम सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक आहे. सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी शिक्षकांनी घेतलेल्या विषयनिहाय पूर्व चाचणीतून विद्यार्थ्यांच्या क्षमता संपादित होतील. त्यानंतर शालेय स्तरावर ३० दिवसांमध्ये काटेकोरपणे सेतूची अंमलबाजवणी करण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांच्या क्षमतेचे आढावा घेण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details