मुंबई - गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचे काल निधन ( Lata Mangeshkar Passes Away ) झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांना पंचत्वात विलीन करण्यात आले. त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक उभारावे, असे पत्र भाजपा आमदार राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ( Ram Kadam Letter Cm Thackeray ) लिहले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Cm Uddhav Thackeray ) यांना लिहलेल्या पत्रात राम कदम म्हणतात की, "भारतरत्न लता दीदींचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात शिवाजी मैदान ( शिवाजी पार्क ) दादर, मुंबई येथे करण्यात आले. म्हणूनच लतादीदींच्या कोट्यवधी चाहत्यांच्या, संगीतप्रेमींच्या आणि हितचिंतकांच्या वतीने माझी नम्र विनंती आहे की, दिवंगत भारतरत्न लतादीदींचे शिवाजी पार्कमध्ये त्यांचे स्मारक उभारले जावे. त्यामुळे जनतेच्या या मागणीचा मान राखून हे स्मारक तात्काळ उभारावे, जेणेकरून हे ठिकाण जगाचे प्रेरणास्थान होईल, ही विनंती."