मुंबई :जमीन गैरव्यवहार मनी लाँड्रीन्ग प्रकरणात (Misappropriation Money Laundering Case) अटक वकील सतीश उके (Advocate Satish Uke) यांनी ते पक्षकार असलेल्या इतर प्रलंबित खटल्यात कारागृहातुन सुनावणीत विडिओ कन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर राहण्याची मुंबई सत्र न्यायालयाची परवानगी मागितली होती. मात्र या बाबत सतीश उके यांना खटला सुरू असलेल्या संबंधित ट्रायल कोर्टाकडे विनंती अर्ज करून परवानगी मागण्याचा निर्देश विशेष पीएमएलए कोर्टाने (Sessions court directs counsel Satish Uke) आज दिला आहे.
वकील सतीश उके यांना वकिली करण्याची परवानगी ट्रायल कोर्टातून घेण्याचे सत्र न्यायालयाचे निर्देश - Satish Uke trial court to practice law
जमीन गैरव्यवहार मनी लाँड्रीन्ग प्रकरणात (Misappropriation Money Laundering Case) अटक वकील सतीश उके (Advocate Satish Uke) यांनी ते पक्षकार असलेल्या इतर प्रलंबित खटल्यात कारागृहातुन सुनावणीत विडिओ कन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर राहण्याची मुंबई सत्र न्यायालयाची परवानगी मागितली होती. मात्र या बाबत सतीश उके यांना खटला सुरू असलेल्या संबंधित ट्रायल कोर्टाकडे विनंती अर्ज करून परवानगी मागण्याचा निर्देश विशेष पीएमएलए कोर्टाने (Sessions court directs counsel Satish Uke) आज दिला आहे.
सतीश उके यांच्यावतीने न्यायालयात अर्ज -सतीश उके यांच्यावतीने वकील रवी जाधव यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता की सतीश उके यांच्याकडून संबंधित ट्रायल कोर्टाला विडिओ कंफ्रेंसिंगच्या माध्यमातून उपस्थिची राहाणे आवश्यकता असेल. त्यांच्या अर्जावर विचार करून परवानगी देईल. या संदर्भात आम्ही काही निर्देश देऊ शकत नाही. कारण याबाबत आपल्या सोयीनुसार विचार करणे संबंधित कोर्टाच्या अधिकार क्षेत्रात आहे, असे सत्र न्यायालयाने म्हटले आहे.
अर्जावर पुढील सुनावणी 31 ऑक्टोबर रोजी -सतीश उके यांचे वकील रवी जाधव यांनी या संदर्भातील अर्ज मुंबई सत्र न्यायालयात केला होता. या अर्जामध्ये असे म्हणण्यात आले होते की, सतीश उके हे पेशाने वकील असल्याने त्यांच्या अनेक न्यायालयांमध्ये विविध खटले सुरू आहे. या प्रकरणात त्यांना वकालत करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. रवी जाधव यांनी अर्जामध्ये असेही म्हटले होते की, सतीश उके हे आर्थर रोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. त्या ठिकाणी वकालत करण्याकरिता आवश्यक असलेले कम्प्युटर इंटरनेट आणि इतर सुविधा देखील पुरवण्यात यावा. याकरिता लागणारा खर्च सतीश उके करण्याकरिता तयार आहे. मात्र जेल प्रशासनाने ते उपलब्ध करून देण्याकरिता न्यायालयाने परवानगी देण्यात यावी, अशी मागणी अर्जातून करण्यात आली होती. यावर जेल प्रशासनाला उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश एम जी देशपांडे यांनी जेल प्रशासनाला दिले आहे. या अर्जावर पुढील सुनावणी 31 ऑक्टोबर रोजी ठेवण्यात आली आहे.
कागदपत्रे, मोबाईल जप्त -गुरुवारी पहाटे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सतीश उके यांच्या नागपूर येथील घरावर छापा टाकला होता. यावेळी ईडीने सतीश उके यांचा लॅपटॉप, मोबाईल आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. ईडीने सतीश उके आणि त्यांच्या बंधूंना कोणत्या प्रकरणात अटक केली आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
लोया प्रकरणात दबाव -मी देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींविरोधात खटले लढलो आहे. न्या. लोया प्रकरणात माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने मला धमकावण्यात आले असल्याचा दावा उके यांनी आपल्या युक्तिवादात केला. मला ताब्यात घेताना सांगण्यात आले नाही की, कोणत्या कारणास्तव ताब्यात घेतले जात आहे. 2016 मध्ये लोयांची केस हाताळताना माझावर हल्ला झाला होता. मी पोलीस तक्रार केली पण घेतली नाही. माझ्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती सतीश उके यांनी न्यायालयात दिली आहे.