मुंबई-मंत्री नवाब मलिक ( Minister Nawab malik ) यांना मुंबई सत्र न्यायालयाने खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता तात्पुरता दिलासा दिला आहे. नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील क्रिटी केअर रुग्णालयात उपचाराकरिता आज परवानगी दिली ( Nawab Malik allowed Treatment in private hospital ) आहे. उपचारादरम्यान नवाब मलिक यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सोबत राहण्याची परवानगी देखील न्यायालयाने दिली आहे. उपचांरासह पोलीस बंदोबस्ताचा खर्च देखील नवाब मलिक यांनाच करावा लागणार आहे. कुर्ला येथील जमीन व्यवहारात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरसोबत झालेल्या आर्थिक व्यवहार प्रकरणात नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली ( Nawab Malik Daud Ibrahim Haseena Parkar ) होती. तेव्हापासून नवाब मलिक आर्थर रोड जेलमध्ये ( Aurthur Road Jail ) न्यायालयीन कोठडीत आहेत.
मलिकांना किडनीचा त्रास :मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना तात्पुरता दिलासा दिला आहे. खासगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी त्यांनी देण्यात आली आहे. परवानगी जरी दिली असली तरी उपचारादरम्यान केवळ कुटुंबातील एकाच सदस्याला सोबत राहण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिक यांच्याकडून वैद्यकीय शस्त्रक्रियेसाठी सत्र न्यायालयात जामीन अर्ज करण्यात आला होता. किडनीच्या त्रासामुळे मलिक यांच्या वकिलाने शस्त्रक्रियेची परवानगी मागितली होती. मलिक यांनी वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज दाखल केला होता. अखेर त्यांना मुंबई सत्र न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.