मुंबई -ख्रिसमसला जोडून आलेल्या रविवारी फिरण्याचा बेत आखणाऱ्या मुंबईकरांना आज त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी २६ डिसेंबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी -विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी- चुनाभट्टी- वांद्रे अप आणि डाउन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या बोरीवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.
हेही वाचा-साप्ताहिक राशीभविष्य : 26 डिसेंबर ते 1 जानेवारी : कसा असेल तुमचा हा आठवडा? जाणून घ्या आचार्य पी खुराणा यांच्याकडून
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक -
मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येत असताना रेल्वेचे वेळापत्रक ( todays Mumbai local rail timing ) जाणून घेऊ. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ या दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविल्या जाणार आहेत. या सेवा भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव, आणि कुर्ला या स्थानकावर थांबतील व विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार ( fast line between Matunga and Mulund stations ) आहेत. तर घाटकोपर येथून सकाळी १०.४० पासून दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या सेवा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकावर थांबणार आहेत. तर ब्लॉक कालावधीत मस्जिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड आणि विद्याविहार येथे सेवा उपलब्ध होणार नाहीत.
हेही वाचा-Covaxin for Children : कोव्हॅक्सिन १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांना देता येणार, डीसीजीआयची मंजुरी
हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -
हार्बर मार्गाच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे स्थानकादरम्यान अप - डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला ( Down Harbour line services to Vashi ) आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहणार आहेत. मात्र, ब्लॉक कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८ ) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जाणार आहेत.
हेही वाचा-Nitin Raut : नितीन राऊतांना काँग्रेस हायकमांडकडून 'दे धक्का'; अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदावरून हटवलं
पश्चिम रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी रविवारी बोरीवली ते गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १०. ३५ ते सायंकाळी ५. ३५ वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात बोरीवली स्थानकात फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ यावर लोकलची ये-जा होणार नाही. ब्लाॅकमुळे काही लोकल सेवा रद्द असणार आहेत.