मुंबई - कोरोनाचे व्यवस्थापन करण्यासाठी सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा द्या, अशा सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिल्या आहेत.
कोरोना व्यवस्थापनात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सेवा द्या; राज्यपालांच्या सूचना - Serve retired medical officers in military
कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. सैन्य दलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला फायदा होईल, असे राज्यपालांनी म्हटले आहे.
शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी बुधवारी दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी सूचना केली.
राज्यात कोरोनाचा प्रसार वाढत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत. कडक संचारबंदीही लागू केली आहे. मुंबई महानगर प्रदेशात रुग्णसंख्या आटोक्यात येत आहे. परंतु, विदर्भ, मराठवाडा भागात रुग्ण कमी होताना दिसत नाहीत. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन १५ दिवस वाढविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सैन्य दलातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा. सैन्य दलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील कोरोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला फायदा होईल, असे राज्यपालांनी म्हटले आहे.