महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोविड लसीचा पहिला साठा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईत दाखल - serum institute covishield vaccine news

कोविड-१९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज (ता. १३) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली.

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल

By

Published : Jan 13, 2021, 8:47 AM IST

Updated : Jan 13, 2021, 8:58 AM IST

मुंबई -कोविड-१९ आजारावरील 'कोविशील्ड' या लसीचा पहिला साठा आज (ता. १३) सकाळी ५.३० वाजता मुंबईमध्ये दाखल झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परळ स्थित एफ/ दक्षिण विभाग कार्यालयात हा साठा पोहोचला आहे.

कोविड लसीचा पहिला साठा पोलिसांच्या बंदोबस्तात मुंबईत दाखल

१ लाख ३९ लसीचा साठा -
पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून सुमारे १ लाख ३९ हजार ५०० डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत ठिकठिकाणी निर्देशित लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे दिनांक १६ जानेवारी २०२१ रोजी लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभ प्रसंगी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

पोलीस बंदोबस्तामध्ये पुण्याहून मुंबईत आणला कोरोना लसीसा साठा...
बंदोबस्तात लसीचा साठा -महानगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी लसीचा हा पहिला साठा पुण्याहून मुंबईत आणला. पोलिसांची दोन वाहने सुरक्षिततेचा बंदोबस्त म्हणून सोबत होती. एफ/दक्षिण विभाग कार्यालयात लस साठा वाहनाचे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्वागत करण्यात आले. त्यानंतर तळमजल्यावरील लस भांडार कक्षात विहित प्रक्रियेनुसार लस साठवण्यात आली आहे.
Last Updated : Jan 13, 2021, 8:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details