मुंबई - येथील मालाड पूर्व दिंडोसी पोलिसांनी नालासोपारा येथून 22 वर्षीय सिरीयल किडनॅपरला अटक ( Mumbai police Arrested Serial Kidnapper ) केली आहे. आरोपीने आतापर्यंत वेगवेगळ्या बहाण्याने ५० हून अधिक मुलींचे अपहरण करून तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले आहेत. आरोपीवर 6 हून अधिक गुन्हे दाखल आहेत, ज्यात 3 अपहरण आणि POCSO कायद्यान्वये तर 3 गुन्ह्यांमध्ये हाफ मर्डर आणि रॉबरी यांचा समावेश आहे. आरोपीचे संपूर्ण कुटुंब गुन्हेगार असून, त्यात काही दिवसांपूर्वी वडील आणि काका दोघेही तुरुंगात आहेत.
नालासोपाऱ्यातून आरोपीला केली अटक -
26 जानेवारी रोजी मालाड राणी सती मार्ग येथून 14 वर्षीय पूजा (नाव बदलले आहे) हिचे अपहरण झाल्याची तक्रार दरसल दिंडोशी पोलीस ठाण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उत्तर मुंबई प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी तातडीने डीसीपी सोमनाथ घार्गे यांच्या नेतृत्वाखाली 3 पथके तयार केली. पोलीस पथकाने आरोपीचा देखावा आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवली. ज्यामध्ये आरोपी नालासोपारा येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सापळा रचून आरोपी मोहम्मद मकसूद (२२) याला नालासोपारा येथून अटक केली.
हेही वाचा -Union Budget 2022 : आज संसदेत सादर होणार अर्थसंकल्प; आरोग्य क्षेत्र, पायाभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याची अपेक्षा