महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सामाजिक न्याय विभागात सफाई कामगारांसाठी स्वतंत्र कार्यासन - धनंजय मुंडे - सफाई कामगारांचे विविध प्रश्न

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन आहे. त्यासाठीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.

Munde
धनंजय मुंडे

By

Published : Aug 28, 2020, 5:34 PM IST

मुंबई : राज्यातील सफाई कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी अनेकदा त्यांना अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे त्यांचे प्रश्न तातडीने सुटावेत म्हणून सामाजिक न्याय विभागात स्वतंत्र कार्यासनाची निर्मिती विचाराधीन आहे. त्यासाठीचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आज दिली.

सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसंदर्भात मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ही माहिती त्यांनी दिली. मुंडे यांनी पुढे सांगितले की, राज्यातील सफाई कामगारांच्या बाबतचा लाड-पागे समितीचा अहवाल व सद्यस्थिती यांचा समन्वय साधून योग्य निर्णय घेतला जाईल. कामगारांच्या निवाराच्या प्रश्न सोडविण्यासाठी विभागामार्फत विशेष प्रयत्न केले जातील. सफाई कामगारांच्या वारसा हक्क नियुक्ती देण्यासंदर्भात प्राधान्याने विचार करणार. नियुक्ती बाबतीत शैक्षणिक अर्हता बाब तपासणार. सफाई कामगारांचा सामाजिक आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सतत प्रयत्न करणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, सफाई कामगार संघटनेचे गोविंदभाई परमार, विविध सफाई कामगार संघटनेचे प्रतिनिधी आणि सामाजिक न्याय ,वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, नगरविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details