महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी आता शासकीय रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड - मुंबई लेटेस्ट न्यूज

राज्यात म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण वाढत असून, त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. तसेच उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांच्या स्वतंत्र पथकाची निर्मिती करावी. अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

राजेश टोपे
राजेश टोपे

By

Published : May 15, 2021, 10:01 PM IST

मुंबई - राज्यात म्युकरमायकोसीस आजाराचे रुग्ण वाढत असून, त्यांच्या उपचारासाठी शासकीय आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड करावेत. तसेच उपचारासाठी विशेषज्ञ आणि नर्स यांच्या स्वतंत्र पथकाची निर्मिती करावी. अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्याची माहिती, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

जालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी याबाबत सांगितले. टोपे म्हणाले, काळी बुरशी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. कोरोना पाठोपाठ हे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. मात्र त्याला तोंड देण्यासाठी आरोग्य विभग प्रयत्न करीत आहे.

उपचारासाठी स्वतंत्र पथकांची निर्मिती

या रुग्णांसाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ, नेत्ररोग तज्ज्ञ, न्युरोसर्जन, प्लास्टीक सर्जन या विशेषज्ञांची आवश्यकता भासते. प्रत्येक ठिकाणी एकाच छताखाली एवढे विशेषज्ञ उपलब्ध होतील असे नाही. त्यामुळे मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा केली जात असून, महात्मा फुले जनारोग्य योजनेत सहभागी असलेल्या ठराविक मोठ्या रुग्णालयात या आजारावर उपचार केले जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगिले.
राज्यातील शासकीय महाविद्यालये आणि खासगी महाविद्यालयातील रुग्णालयांमध्ये विशेषज्ञ उपलब्ध होतात, त्याठिकाणी काळी बुरशीच्या रुग्णांवर उपचाराची सोय करण्यात यावी. तेथे स्वतंत्र वॉर्ड करतानाच उपचारासाठी स्वतंत्र पथक देखील नेमण्यात यावेत, अशा सूचना केल्याचे टोपे यांनी यावेळी सांगितले.

हाफकीनकडून १ लाख इंजेक्शनची खरेदी करणार

या उपचारासाठी आवश्यक असलेले इंजेक्शन उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आज ५००० इंजेक्शन प्राप्त झाले असून, त्याचे वितरण करण्यात आले आहे. हाफकिन महामंडळाच्या माध्यमातून १ लाख इंजेक्शन खरेदीची प्रक्रिया सुरू असल्याचेही यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. अंगावर दुखणे काढणे आणि उशीरा उपचारासाठी दाखल होण्याच्या प्रमाणामुळे राज्याचा मृत्यूदर जास्त असल्याचंही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

'सीबीसी' आणि 'सीआरपी' रक्त तपासणी करण्याच्या सूचना

राज्यात कोरोना उपचारासाठी कोविड सेंटर्स (सीसीसी) आणि कोविड केअर रुग्णालये आहेत (डिसीसीएच) तेथे दाखल रुग्णांच्या आवश्यक त्या रक्त तपासण्या करण्यात याव्यात, त्याचबरोबर सीसीसी मधील लक्षणे नसलेल्या रुग्णांची सीबीसी आणि सीआरपी या दोन रक्त तपासण्या करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली.

हेही वाचा -जातीवाचक बोलल्याबद्दल अभिनेत्री मुनमुन दत्ता विरोधात मध्य प्रदेशात गुन्हा दाखल

ABOUT THE AUTHOR

...view details