मुंबई : आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात(Share Market) मोठी घसरण बघायला मिळाली. सोमवारी शेअर बाजाराला सुरूवात होताच सेन्सेक्समध्ये(Sensex) एक हजार अंकांची घसरण बघायला मिळाली. एक हजार अंकांनी घसरून सेन्सेक्स 58,572 अंकांच्या पातळीवर आला होता. जागतिक बाजारातील(World Share Market) मंदीच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स,(Reliance) कोटक,(Kotak) बजाज फायनान्स(Bajaj Finance) अशा मोठ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये मोठी घसरण बघायला मिळाली.
निफ्टीतही घसरण
सेन्सेक्ससह निफ्टीतही बाजाराच्या सुरूवातीला 129.85 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17,634 अंकांवर घसरला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये चार टक्क्यांची घसरण बघायला मिळाली. रिलायन्सकडून तेल रिफायनरीतील 20 टक्के भागभांडवलाची सौदी अरामकोला 15 अब्ज डॉलर्सना विक्री केली जाणार आहे. याचा रिलायन्सच्या शेअरला मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. याशिवाय मारुती, बजाज फायनान्स, कोटक बँक, बजाज फिनसर्व्हचे शेअरही घसरले. दुसरीकडे भारती एअरटेल, पॉवरग्रिड, एशियन पेंटस्, इंडसइंड बँक, आयटीसीचे शेअर मात्र वधारले. भारती एअरटेलचे शेअर सहा टक्क्यांनी वधारले.