मुंबई - रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धसदृष्य ( Russia Ukraine Conflict Impact On Indian Share Market ) स्थितीचे परिणाम शेयर बाजारात दिसून येत आहेत. आज सेंसेक्स 800 पॉईंटने ( Todays Sensex ) घसरला असून निफ्टी 16,969 पॉईंटवर ( Todays Nifty ) सुरू झाला आहे.
दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून भाषण केले होते. या भाषणात युक्रेनसोबत संघर्षाचे संकेत मिळत होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे आज शेयर मार्केटमध्ये पडझड बघायला मिळाली.