मुंबई - शेअर बाजाराचा निर्देशांकात दिवसाखेर 1,024 अंशांची घसरण ( Sensex crashed 1024 points ) झाली आहे. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक 58 हजारांच्या खाली पोहोचला आहे. जागतिक बाजारात स्थिरता असूनही बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरची जोरदार विक्री झाली आहे.
विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मोठ्या प्रमाणात भांडवल ( foreign capital outflows ) काढून घेतले. त्याचा शेअर बाजारावर परिणाम झाल्याचे शेअर बाजार विश्वलेषकांनी सांगितले. भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण विषयक लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावधगिरीची पवित्रा घेतला आहे.
हेही वाचा-Home Loan: तुम्ही ईएमआय भरण्यास सक्षम नसाल तेव्हा काय करावे? घ्या जाणून
दिवसाखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 1,023.63 अंशांनी घसरून 57,621.19 वर पोहोचला आहे. तर निफ्टीचा निर्देशांक 302.70 अंशांनी घसरून 17,213.60 वर पोहोचला आहे. एचडीएफसी बँकेचे सर्वाधिक 3.5 टक्क्यांनी शेअर घसरले आहेत. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, एल अँड टी, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी आणि कोटक बँकेचे शेअर घसरले आहेत. तर दुसरीकडे पॉवरग्रीड, एनटीपीसी, टाटा स्टील, एसबीआय आणि अल्ट्राटेक सिमेंट अशा कंपन्यांचे शेअर 1.88 पर्यंत ऴवधारले आहेत.