मुंबई - विद्यार्थ्याला हतकड्या घालून वडिलांसोबत सामंजस्याच्या कागदावर सह्या करण्यास भाग पाडले, असल्याचा खळबळजनक आरोप देवनार पोलिसांवर लावण्यात आला आहे. हे प्रकरण ३० जुलै २०२२ रोजी रात्री ११:३० वाजेच्या सुमारास घडले आहे. व्यंकटेश सुब्रमण्यम यांच्यावर एमएमआरडीए कॉलनीतील काही लोकांनी हल्ला केला. आधी त्यांना मारहाण करण्यात आली होती. नंतर त्यांच्या १८ वर्षांच्या मुलाला, जो बचावासाठी आला. त्यालाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. त्यानंतर त्याच्या पत्नीलाही बेदम मारहाण करण्यात आली आहे. व्यंकटेश यांनी अनेकवेळा पोलीस नियंत्रण कक्षाला १०० नंबर डायल केला, पण खेदाने फक्त आश्वासन मिळाले. पंरतु, पोलिसांची मदत काही पोहोचली नाही.
दरम्यान व्यंकटेशवर विष्णू नावाच्या व्यक्तीने धारदार शस्त्राने वार केले आहे. व्यंकटेशवर त्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. शरीरावर जखमाही झाल्या आहेत. तरीही पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही. या हल्ल्याचा सगळा प्रकार जवळच्या चामुंडा मेडिकलमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. नंतर व्यंकटेशला रुग्णालयात नेण्यात आले. काही वेळाने व्यंकटेश तो त्याच्या कुटुंबासह तक्रार करण्यासाठी देवनार पोलीस स्टेशनला पोहोचला. पंरतु, देवनार पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने पिडीत व्यंकटेशवर त्याचा मुलगा आणि पत्नीवर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. व्यंकटेशचा मुलगा सर्वेश हा बारावीचा विद्यार्थी आहे. व्यंकटेशच्या हातात बेड्या घालून पोलिसांनी देवनार पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.