मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन NCP National Conventio रविवारी दिल्लीत पार पडत आहे. मात्र या अधिवेशनात सत्ताधारी एनडीएला धक्का देण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. याची चर्चा अधिक होणार असून भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीची पक्की मांडणी करण्याचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे. NCP leader Sharad Pawar विरोधी पक्षांच्या नेत्यांची एकजूट करण्यासाठी बिहारमधील पटना कोलकाता तसेच मुंबईत काही कार्यक्रम घेतले जावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे.
राष्ट्रवादीचे आठवे राष्ट्रीय अधिवेशनदिल्लीतील ताल कटोरा स्टेडियम मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनात आर्थिक सामाजिक कृषी विषयक महिला सक्षमीकरण परराष्ट्र संबंध Congress Aniket Joshi Vivek Bhavsar Information यावरील काही ठराव संमत केले जाणार आहेत. मात्र सर्वात महत्त्वाचा ठराव असणार आहे. NCP leader Sharad Pawar तो विरोधी पक्षांच्या एकजुटीची आवश्यकता आणि त्यासाठी करण्यात येणारी आखणीबाबत.
काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीला पर्याय नाही किमान समान कार्यक्रम आवश्यक विरोधी ऐकण्यासाठी किमान समान कार्यक्रम आवश्यक असून त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी घेतली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैचारिक भूमिका जवळपास सारख्या आहेत. NCP leader Sharad Pawar मात्र जेडीयू आणि सपा यांच्यात आणि काँग्रेस यांच्या वैचारिकतेमध्ये मतभिन्नता आहे. माकपचे सिताराम येचुरी या ऐक्या बाबत सकारात्मक आहेत. अद्यापही काँग्रेसने या तिसऱ्या आघाडीबाबत ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यातच काँग्रेसबरोबर आप आणि तृणमूलचेही मतभेद आहेत या एकूण पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
काँग्रेस शिवाय पर्याय नाही तिसऱ्या आघाडीसाठी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने विरोधी पक्ष प्रयत्न करीत आहेत. NCP leader Sharad Pawar मात्र विरोधी पक्षांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे लागणार आहे. चंद्रशेखर राव, ममता बॅनर्जी, सिताराम येचूरी, यशवंत सिन्हा, उद्धव ठाकरे यांच्यासारखे काही नेते या विरोधी आघाडी बाबत सकारात्मक आहेत. मात्र काँग्रेसने या बैठकीबाबत अथवा तिसऱ्या आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेतलेली नाही. काँग्रेस अजूनही निर्णायक स्थितीत नाही. त्यामुळे जोपर्यंत काँग्रेस या आघाडीत सहभागी होत नाही. तोपर्यंत आघाडीला ताकद मिळणार नाही, कारण काँग्रेसची वोट बँक देशभरातल्या सर्व राज्यांमध्ये आहे. त्यामुळे या विरोधकांच्या आघाडीला काँग्रेस शिवाय पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अनिकेत जोशी यांनी व्यक्त केले आहे.
काँग्रेसला वगळून आघाडी यशस्वी होणारसत्ताधारी भाजपा आणि एनडीएला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी जोरदार विरोध दर्शवण्यासाठी तिसऱ्या आघाडीचा प्रयत्न काही महत्त्वाच्या नेत्यांकडून सुरू आहे. मात्र तिसऱ्या आघाडीमध्ये जोपर्यंत काँग्रेस सारखा पक्ष सहभागी होणार नाही. तोपर्यंत याला काहीही अर्थ राहणार नाही. कारण काँग्रेस ने अद्यापही एकला चलो ची भूमिका घेतलेली आहे. राहुल गांधी याबाबत काही बोलायला तयार नाहीत आणि सोनिया गांधी आजारी आहेत. त्यामुळे काँग्रेस या तिसऱ्या आघाडीत सहभागी होते की नाही हे महत्त्वाचे आहे. शरद पवार हे सर्व पक्षांची मोट बांधण्यात यशस्वी जरी झाले तरी काँग्रेस शिवाय लढणे आणि भाजपाला टक्कर देणे हे शक्य नाही. हे त्यांना माहित आहे म्हणूनच ते काँग्रेसने सहभागी व्हावे, यासाठी आग्रह धरत आहे. तसे न झाल्यास पुन्हा एकदा ही आघाडी अपयशी ठरेल यात शंका नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विवेक भावसार यांनी व्यक्त केली आहे.