मुंबई -पालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांना ३ वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी ग्राह्य धरून वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या अनुदानित प्राथमिक शाळांतील शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई शिक्षक संघ आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदने या सबंधित पाठपुरावा करण्यात आलेला होता त्यांच्या पाठपुराव्याला आता यश आले आहे.
मुंबई महानगरपालिका अनुदानित व विनाअनुदानित प्रथमिक शाळांमध्ये जानेवारी 2004 पासून शिक्षण सेवक योजना लागू करण्यात आली. यानंतर नेमलेल्या शिक्षण सेवकांचा तीन वर्षाचा शिक्षण सेवक कालावधी वरिष्ठ श्रेणीसाठी ग्राह्य धरला जात नव्हता. २००४ साली नेमणूक झालेल्या शिक्षण सेवकांना 2007 साली ३ वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना नियमित सहाय्यक शिक्षकपदी नेमणूक करण्यात आली. परंतु ही सेवा वरिष्ठ श्रेणी निवड श्रेणीसाठी ग्राह्य धरण्याचे परिपत्रक मुंबई मनपा काढत नव्हती. शिक्षकांना राज्य शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे शिक्षण सेवक कालावधी बारा वर्षे सेवा पूर्ण केल्यावर मिळणाऱ्या वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्रहित धरणे आवश्यक होते. पण राज्य शासनाच्या परिपत्रकाला न जुमानता मुंबई मनपाचा शिक्षण विभाग व इतर प्रशासकीय विभागांनी मनमानी केल्याची माहिती परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिली.
हे ही वाचा -गणपती आगमनाच्या मुहुर्तावर एकाच वेळी 21 शेतकऱ्यांनी खरेदी केले 21 ट्रॅक्टर