मुंबई - ज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर यांचे आज शुक्रवार(दि. 21 जानेवारी)रोजी पहाटे मुंबईत नानावटी रुग्णालयात निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. (Senior journalist Dinkar Raikar passes away) रायकर यांनी पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक काळ सक्रियपणे काम केले आहे. मराठी पत्रकारितेत त्यांचे मोठे योगदान आहे. दरम्यान, रायकर यांच्या निधनाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींचा अभ्यासक हरपला, अशा शब्दांत विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती
रायकर यांना डेंग्यू आणि करोनाचा संसर्ग झाला होता. (Marathi journalism On Dinkar Raikar) त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरू होते. त्यामुळे उपचारानंतर त्यांचा डेंग्यू बराही झाला होता. परंतु, त्यानंतर फुप्फुसातील संसर्ग काही प्रमाणत वाढला होता. त्यावर नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांची कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र, शुक्रवारी पहाटेच्या सुमाराला त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अनेक पुरक्कार देऊन गौरवण्यात आले
दिनकर रायकर यांना पत्रकारिता क्षेत्रात ५० वर्षांहून अधिक पर्षांचा अनुभव होता. त्यांनी इंडियन एक्स्प्रेससह विविध दैनिकांत काम केले आहे. सध्या ते लोकमत वृत्तपत्र समूहात समन्वय संपादक म्हणून कार्यरत होते. (Dinkar Raikar passes away) या काळात त्यांना अनेक पुरक्कार देऊन गौरवण्यात आले होते. पुढारीकार ग. गो. जाधव पुरस्कार, सुशीलादेवी देशमुख पत्रकारिता पुरस्कार, कृषीवलकार प्रभाकर पाटील पत्रकारिता पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते.