महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक - Congress leaders meeting

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. काँग्रेसने मात्र या पत्रकार परिषदेतून आपले पाऊल मागे घेत वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बैठक घेतली आहे.

काँग्रेस

By

Published : Nov 23, 2019, 1:42 PM IST

Updated : Nov 23, 2019, 2:54 PM IST

मुंबई -राज्यात आज शनिवारी सकाळी राजभवन येथे झालेल्या राजकीय भुकंपानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते खडबडून जागे झाले आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर काँग्रेस नेत्यांची तातडीने बैठक आयोजीत केली होती.

विजय वडेट्टीवार यांच्या घरी काँग्रेस नेत्यांची बैठक

हेही वाचा... अरे..राऊत आता तरी शांत बस बाबा...चंद्रकांत पाटलांचा सेनेवर 'बाण'

काँग्रेसच्या या बैठकीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, सरचिटणीस वेणुगोपाल, राज्य प्रभारी मल्लिकार्जून खर्गे यांच्यासह पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण विजय वडेट्टीवार सुशीलकुमार शिंदे आदी प्रमुख नेते उपस्थित असून काँग्रेसचे काही आमदारही या बैठकीला उपस्थित राहिले आहेत.

हेही वाचा... चर्चेचं लांबलं गुऱ्हाळ... अन् पुन्हा उद्वीग्न झाले अजित पवार ?

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद सुरू असतानाच काँग्रेसने मात्र या पत्रकार परिषदेतून आपले पाऊल मागे घेत वडेट्टीवार यांच्या बंगल्यावर बैठक घेतली आहे.

Last Updated : Nov 23, 2019, 2:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details