मुंबई -सध्या राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Balasaheb Thorat on assembly speaker election ) व भाजप यांचे नवीन सरकार स्थापन झाले असले तरी, गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या ( Governor Koshyari over assembly speaker election ) निवडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. जानेवारी २०२१ रोजी काँग्रेस नेते व आताचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra assembly speaker election ) यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता व तेव्हापासून हे पद रिक्त आहे. मात्र, यावरून काँग्रसने आता आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लक्ष्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आपण जवळपास तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती. मग, आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे ( Congress ) ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपालांनी दिलेल्या पत्राचाच आधार? -राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन उद्या, ३ आणि सोमवारी ४ जुलै रोजी बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात नव्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असून, त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्या संदर्भातील पत्रही दिले होते. याच पत्राचा आधार घेऊन काँग्रेसने आता राज्यपालांवर टीका केली आहे. या सर्व प्रकरणात लोकशाहीची आणि राज्यघटनेची थट्टा झाल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.