महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Senior Citizens Safety Maharashtra : राज्यात ज्येष्ठ नागरिक असुरक्षित; नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालातून धक्कादायक माहिती

ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र असुरक्षित maharashtra unsafe for senior citizens होत चालला असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ncrb report on maharashtra senior citizen अहवातून समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण crime rate against senior citizens maharashtra दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

Senior Citizens Safety Maharashtra
राज्यात ज्येष्ठ नागरिक असुरक्षित

By

Published : Sep 3, 2022, 1:18 PM IST

मुंबई : ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र असुरक्षित maharashtra unsafe for senior citizens होत चालला असल्याची धक्कादायक माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या ncrb report on maharashtra senior citizen अहवातून समोर आली आहे. ज्येष्ठ नागरिकांविरोधात घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण crime rate against senior citizens maharashtra दिवसेंदिवस वाढ होत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. मागील 2021 या वर्षी महाराष्ट्रात 4 वर्षांच्या तुलनात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिकांच्या विरोधात सर्वाधिक गुन्हे Crime rate against senior citizens घडले आहेत. भारतामध्ये कोरोना महामारीमुळे 2020 मध्ये लॉकडाऊन असल्याने सर्वाधिक कमी गुन्हे घडले आहे.

ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबीयांकडून त्रास : नातेवाईकांकडून शारीरिक व मानसिक छळ केला जातो मालमत्ता नावावर करून देण्यासाठी मुले त्रास देतात. आर्थिक कारणावरून सुनेकडून त्रास दिला जातो. अशा स्वरूपाच्या तक्रारी ज्येष्ठ नागरिक कक्षाकडे वाढत आहेत. जवळचेच नातेवाईक ज्येष्ठांना त्रास देत असल्याचे दिसून आले आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्यांची मुले, सुना, मालमत्ता व आर्थिक कारणासाठी त्रास देत असल्याचे आढळून आले आहे. अशा तक्रारींत त्यांना बोलावून ताकीद दिली जाते. त्यांनी न ऐकल्यास गुन्हा दाखल केला जातो. अशा स्वरूपाचे काही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा 2007 ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे भारतीय नागरिक म्हणून करते. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात वृद्ध व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांची लोकसंख्या सुमारे 1.25 कोटी आहे. 2014 पासून नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांचा आकडेवारी प्रकाशित करत आहे. 2021 मध्ये 60 वर्षांवरील 6190 ज्येष्ठ नागरिक विविध गुन्ह्यांचे बळी ठरले आहे.

भयावह महाराष्ट्र : NCRB च्या अहवालानुसार एक गोष्ट समोर आली आहे की 2020 वगळता गेल्या 5 वर्षांमध्ये गुन्ह्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. 2017 ते 2021 या 5 वर्षांत फक्त 2020 मध्ये सर्वात कमी प्रकरणे नोंदवली गेली ती 4909 इतकी होती. महाराष्ट्रात गुन्ह्यांच्या नोंदीमध्ये सातत्याने होणारी वाढ हे राष्ट्रीय स्तरावर प्रतिबिंबित झाले आहे. महाराष्ट्रात 2017 मध्ये 5321 आणि 2018 मध्ये 5961 प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर पुन्हा एकदा 2021 मध्ये ज्येष्ठ नागरिकांवरील गुन्ह्यांचा आकडा 6000 च्या वर गेला आहे.2017 मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मारहाण केल्याचे 6234 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा ऐवज चोरीचे 3235 गुन्हे घडले आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीचे प्रकार वाढत आहेत.

गुन्ह्यांची आकडेवारी : 2017 मध्ये याबाबत 2327 गुन्हे दाखल झाले. त्यापैकी मुंबईतच 956 ज्येष्ठांची फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे. तसेच खून (983), सदोष मनुष्यवध (52), खुनाचा प्रयत्न (434), विनयभंग (165), खंडणी (70), जबरी चोरी (3265), दरोडा (34) असे गुन्हे दाखल झाले आहेत.

वर्षांनुरुप गुन्ह्यांची संख्या :
2017 मध्ये 5321 गुन्ह्यांच्या तुलनेत 2018 मध्ये महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांवरील एकूण 5961 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात वाढ दिसून आली आहे.

2018 मध्ये 5961 गुन्ह्यांच्या तुलनेत 2019 मध्ये महाराष्ट्रात ज्येष्ठ नागरिकांवरील एकूण 6163 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात वाढ दिसून आली आहे.

2020 महाराष्ट्रात 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांवरील एकूण 4909 गुन्ह्यांची नोंद झाली असून 2019 मध्ये 6163 गुन्ह्यांची नोंद झाली आहे त्यात घट झाली आहे.

2018 मध्ये 5961 प्रकरणे नोंदवली गेली, 2931 प्रकरणे आरोपपत्र, 122 प्रकरणे दोषी, 5442 जणांना अटक, 4785 जणांवर आरोपपत्र दाखल आणि 159 जणांना दोषी ठरवण्यात आले.

2019 मध्ये 6163 प्रकरणे दाखल, 3071 प्रकरणे आरोपपत्र, 144 प्रकरणे दोषी, 4888 जणांना अटक, 4837 जणांवर आरोपपत्र दाखल आणि 171 जण दोषी ठरवले.

2020 मध्ये 4909 प्रकरणे नोंदली गेली 3162 प्रकरणे आरोपपत्र, 60 प्रकरणे दोषी, 4370 जणांना अटक, 5033 जणांवर आरोपपत्र आणि 84 जणांना दोषी ठरवण्यात आले.

2021 मध्ये 6190 प्रकरणे नोंदवली गेली आणि 72.9% (3703) प्रकरणे चार्जशीट झाली.

ज्येष्ठांना समजून घेण्यास कुटुंबीय असमर्थ : ज्येष्ठ नागरिकांना घरातील लोकांनी समजून घ्यायला हवे जेष्ठ नागरिक आणि परिवारातील इतर सदस्यांनी त्यांना समजून घ्यायला हवे सध्या विभक्त कुटुंब पद्धती वाढल्या असल्यामुळे जेष्ठ नागरिकांवर अत्याचार याचे गुन्ह्यात वाढ झाली आहे. मुळे राज्य सरकारने सामाजिक संघटनेला वृद्ध आश्रम चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या सोयी पुरवणे गरजेचे आहे जेणेकरून जेष्ठ नागरिकांना हक्काचा निवारा मिळू शकेल सध्या अनेक सामाजिक संघटना या संदर्भात काम करत आहे मात्र राज्य सरकारने त्यांना अधिक मदत केल्यास आणखी अनेक सामाजिक संघटना यामध्ये सहभाग सहभागी होऊ शकतात. पोलीस विभागाने देखील अशा ज्येष्ठ नागरिकांवर होत असलेल्या गुन्ह्यात संदर्भात लवकर छळा लावणे आवश्यक आहे असे माजी निवृत्त पोलिस अधिकारी पि.के जैन यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :Father Poisoned Children Chandrapur : जन्मदात्यानेच चिमुकल्यांना पाजले विष; बोर्डा गावातील घटनेने खळबळ

ABOUT THE AUTHOR

...view details