मुंबई - राज्याचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. सभागृहात अनेक प्रश्नांवर चर्चा होऊ शकते. त्यामुळे लोकशाहीचे रक्षक असाल तर राज्याचं अधिवेशन (Sudhir Mungantiwar on Assembly Winter Session 2021) एका आठवड्याने वाढवलं पाहिजे, (Maharashtra Assembly Winter Session 2021) अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री आजारी असल्यामुळे नागपूरला येणार नाहीत (Uddhav Thackeray absence in Assembly Session) म्हणून हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्यात आले मात्र मुख्यमंत्री अधिवेशनात आले नाहीत.आम्ही सांगू तेच धोरण, आम्ही बांधू तेच तोरण, हे जे काही चालले आहे ते चुकीच आहे. डॉक्टर सांगतात कोरोना आहे म्हणून मी दवाखान्यात जाणार नाही असं चालतं का? अशाने प्रश्न सुटणार आहेत का? असे प्रश्नही सुधीर मुनगंटीवार (Senior BJP leader Sudhir Mungantiwar) यांनी उपस्थित केले.
Sudhir Mungantiwar on MVA Govt : 28 नोव्हेंबर 2019 ही जनतेसाठी विश्वासघात दिवस, मुख्यमंत्र्यांचा त्यांच्याच आमदारांवर विश्वास नाही - मुनगंटीवार - Sudhir Mungantiwar criticizes Mahavikas Aghadi government
२८ नोव्हेंबर २०१९ हा जनतेचा विश्वासघात करणारा दिवस ठरला. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले असताना हिंदुत्वाचे धर्मांतर करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले, अशी टीका सुधीर मुनगंटीवार (Senior BJP leader Sudhir Mungantiwar) यांनी केली. त्याचबरोबर हिवाळी अधिवेशनाचे ठिकाण, कालावधी, आजारपणामुळे मुख्यमंत्र्यांची अधिवेशनाला अनुपस्थिती (Uddhav Thackeray absence in Assembly Session), सभागृहातील पंतप्रधानांची नक्कल (Mimicry of the Prime Minister Modi), विधानसभा अध्यक्षांची निवड व मुख्यमंत्र्यांचा चार्ज दुसऱ्या कुणाला द्यावा की ? यासह अधिवेशनासंबंधित (Maharashtra Assembly Winter Session 2021) अन्य प्रश्नांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. त्यांच्याशी केलेली ही बातचीत..
प्रश्न - अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी तुमची मागणी सरकारने अमान्य केली. लोकशाहीचे रक्षकच आता भक्षक झाले आहेत असे तुम्ही म्हणता?
उत्तर - २८ नोव्हेंबर २०१९ हा जनतेचा विश्वासघात करणारा दिवस ठरला. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जनतेने स्पष्ट बहुमत दिलेले असताना हिंदुत्वाचे धर्मांतर करून महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. अधिवेशनात सर्व आयुधं वापरून जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असतो. या अधिवेशनात इतके प्रश्न आहेत, इथे प्रश्न सोडवण्यासाठी कालावधी वाढवून द्यावा अशी आमची इच्छा होती. आमच्या घरी काही खुर्च्या नाहीत म्हणून आम्ही तिथे बसायला येतोय अशातला भाग नाही. आम्ही सांगू तेच धोरण, आम्ही बांधू तेच तोरण, हे जे काही चालले आहे ते चुकीच आहे. डॉक्टर सांगतात कोरोना आहे म्हणून मी दवाखान्यात जाणार नाही असं चालतं का? अशाने प्रश्न सुटणार आहेत का? कोरोना मध्ये अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. स्पेशल वॉर रूम तयार करायचे आहेत. लसीकरण मोहीम व्यवस्थित सुरू ठेवायची आहे. कोरोनाची भीती दाखवून अधिवेशन घ्यायचे नाही असा या सरकारचा पवित्रा आहे. ससा पेक्षाही भेकड हे सरकार आहे. कोरोनावर एक दिवस विशेष अधिवेशन बोलवावे ही आमची मागणी आहे. हे सर्व प्रश्न सोडवायचे असतील तर या अधिवेशनाचा कालावधी वाढवायला हवा होता.