महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माध्यमिक शालान्त परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; दहावी 3 मार्च, तर बारावीची 18 फेब्रुवारी पासून 'परीक्षा'

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाला मंडळाकडून अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. यानुसार दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च 2020 तर, बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 ला सुरू होणार आहे.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाला मंडळाकडून अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

By

Published : Nov 18, 2019, 3:31 PM IST

Updated : Nov 18, 2019, 4:46 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेच्या वेळापत्रकाला मंडळाकडून अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. यानुसार दहावीची लेखी परीक्षा 3 मार्च 2020 तर, बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी 2020 ला सुरू होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक 15 ऑक्टोबरपासून शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले होते. यासंदर्भात काही सूचना असल्यास पालक व शिक्षक संघटनांना पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती. या सुचनांचा विचार करून राज्य शिक्षण मंडळाने जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकात बदल करून त्याला अंतिम स्वरुप दिले आहे. यामुळे आता राज्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा तसेच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम या बारावीच्या परीक्षेची सुरुवात 18 फेब्रुवारी 2020 ला होणार आहे तर ही परीक्षा 18 मार्च 2020 पर्यंत चालणार आहे.

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच दहावीच्या (नवीन पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार) परीक्षेची सुरुवात 3 मार्च 2020 ला होणार असून, ही परीक्षा 23 मार्चपर्यंत चालणार आहे. यासंदर्भात राज्य शिक्षण मंडळाने अंतिम वेळापत्रक पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध केले आहे.

राज्य शिक्षण मंडळाकडून आज जाहीर करण्यात आलेले हे दहावी बारावीचे वेळापत्रक अंतिम असून यासाठी खात्री करून घेण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. तसेच सोशल मीडियावर विविध प्रकारच्या तारखा आणि वेळापत्रकां संदर्भात जाहीर होत असलेल्या माहितीवर विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे त्यांनी म्हटले आहे.

संबंधित लेखी परीक्षेचे वेळापत्रक अंतिम असून त्यामध्ये बदल करणे आवश्यक असल्यास मंडळाकडून माहिती जाहीर केली जाईल, असे अशोक भोसले यांनी सांगितले. मात्र, तोपर्यंत कोणत्याही अफवा अथवा इतर माहितीवर पालक आणि विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये, असे ते म्हणाले.

विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी-तोंडी परीक्षा व अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत संबंधित शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येणार असल्याचेही भोसले यांनी सांगितले आहे.

Last Updated : Nov 18, 2019, 4:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details