महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उद्या मुंबईत आघाडीतल्या मित्रपक्षांशी चर्चा करणार - पृथ्वीराज चव्हाण - शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी युती

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची आज सकाळी दहा वाजता स्वतंत्र बैठक होईल. त्यानंतर दुपारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईला जातील. त्यानंतर उद्या (शुक्रवार) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होईल. सायंकाळपर्यंत आमच्याकडे युतीचा संपूर्ण आराखडा तयार असेल, अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Sena-Congress-NCP alliance will be announced on Friday evening said Pruthviraj Chavan

By

Published : Nov 21, 2019, 8:34 AM IST

Updated : Nov 21, 2019, 4:52 PM IST

2:15 PM : काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल हे शरद पवार यांच्या निवासस्थानी दाखल.

12:24 PM :राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू.

11:00 AM :पाच वर्षे सरकार चालवायचे असेल तर आधी बरेच मुद्दे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्याबाबत चर्चा चालू आहेत. आम्ही आज मुंबईला जाऊ - बाळासाहेब थोरात (अध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस)

10:18 AM :आज काँग्रेस आणि राष्ट्रवादीची बोलणी होईल, उद्या मुंबईमध्ये कदाचित अंतिम निर्णय घेतला जाईल - के. सी. वेणुगोपाल (काँग्रेस)

10:07 AM : पुढील वाटचालीसंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीने चर्चा केली आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे होणार पुढील वाटचाल - मल्लिकार्जुन खरगे (काँग्रेस)

09:47 AM :काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरी सुरु असलेली काँग्रेस कार्यकारिणीची बैठक पूर्ण.

09:20 AM : के. सी वेणुगोपाल, अधीर रंजन चौधरी, अंबिका सोनी, अहमद पटेल, ए. के. अँटोनी आणि इतर काँग्रेस नेते दिल्लीतील '१० जनपथ'वर दाखल.

नवी दिल्ली -राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा लवकरच सुटण्याची शक्यता दिसत आहे. उद्या (शुक्रवार) सायंकाळपर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीची घोषणा होईल अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यातील सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची काल (बुधवारी) तब्बल ६ तासानंतर बैठक संपली. मात्र, आज (गुरुवार) पुन्हा बैठकांचा सिलसिला सुरूच राहणार असल्याचे आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर सांगितले.

अशा होतील बैठका :

आज सकाळी दहा वाजता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची स्वतंत्र बैठक होईल. त्यानंतर दुपारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते मुंबईला जातील.

उद्या (शुक्रवार) शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची संयुक्त बैठक होईल. त्यानंतर सायंकाळपर्यंत आमच्याकडे युतीचा संपूर्ण आराखडा तयार असेल, अशी माहिती काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

Last Updated : Nov 21, 2019, 4:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details