मुंबई - आयकर विभागाने मुंबईमध्ये मोठी कारवाई केली आहे. ही कारवाई दक्षिण मुंबईमध्ये करण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह येथे 'आलं जाब्रिया कोर्ट' नावाची इमारत आहे. आयकर विभागाने बेनामी मालमत्ता म्हणून घोषित केली आहे. ही इमारत आयकर विभागाने जप्त केली आहे. दरम्यान, यामध्ये सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणांतील पैसे गुंतविल्याच्या संशयावरून या इमारतीच्या व्यवहाराची चौकशी केली होती.
सक्तवसुली संचालनालयाला संशय
या इमारतीचे सध्याचे बाजार मूल्य (१०० कोटी)आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा यातले पैसे या इमारतीच्या खरेदीसाठी वापरले असल्याचा संशय सक्तवसुली संचालनालय आला होता. ज्या कंपनीने ही इमारत विकत घेतली. त्या कंपनीकडे ही इमारत घेण्याचे पुरेसे पैसे नव्हते. असही चौकशीत समोर आले होते. यात आर्शद सिद्दीकी मार्फत पैसे गुंतवण्याचा संशय सक्त वसुली संचालनालयाला होता.
राज घराण्यातील व्यक्तींची भेट
सिद्धीकी व भुजबळ यांचा पुतण्या समीर हे डिसेंबर, २०१३ मध्ये कुवेतला गेले होते. कुवेतमध्ये त्यांनी त्या इमारतीचा हक्क असलेल्या राज घराण्यातील व्यक्तींची भेट घेऊन करारावर चर्चा केली होती. असे पुरावे ईडीला मिळाले होते. याबाबत ईडीकडून तपास सुरू आहे. याबाबत संबंधित खरेदीदार कंपनीला कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. हा तपास सुरू असतानाच, शुक्रवारी ही इमारत बेनामी मालमत्ता म्हणून घोषित करत, ती आयकर विभागाने जप्त केली आहे.