मुंबई- राज्यात वंचित नावाचा एक पक्ष उदयास आलेला असून या पक्षामध्ये धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होत असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'वंचित'वर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या मुख्य कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचे नाव न घेता त्यांच्या धोरणामुळे भाजपला कसा फायदा होतो यासाठीचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.
हेही वाचा - रखडलेल्या गृहप्रकल्पांसाठी विशेष खिडकीतून १० हजार कोटी; निर्यातवाढीसाठी विविध योजना अर्थमंत्र्यांकडून जाहीर
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेत उमेदवार उभे केले होते. त्यांच्या उमेदवारांनी घेतलेली सर्व मते आणि जाहीर झालेले निकाल हे तपासून पाहिले तर या वंचितचा सर्व फायदा हा भाजपला झालेला आहे. त्यामुळे राज्यातील वंचित हे भाजपला फायदा करून देण्यासाठीच मैदानात उतरले असल्याची टीकाही पवार यांनी केली.