महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Section 144 Applyed Mumbai : मुंबईत दोन लस घेणारेच पार्टीत करू शकणार जल्लोष, ओमायक्रॉनमुळे निर्बंध कठोर - Section 144 is applicable in Mumbai

मुंबई - राज्यात (Omicron) ओमायक्रॉच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्रीपर्यंत मुंबईत कलम (144) (Section 144 applies in Mumbai) लागू करण्यात आले आहे. पार्ट्यांमध्ये फक्त दोन लस घेतलेल्यांनाच नव्या वर्षाचा जल्लोष साजरा करता येणार आहे. ( Omicron In Mumbai ) 'कोरोनामुळे लोकांकडून योग्य वर्तन न केल्यास कारवाई केली जाईल' असही पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे.

Section 144 Applyed Mumbai : मुंबईत ओमायक्रॉनबाबत निर्बंध अधिक कठोर, आजपासून नवी नियमावली लागू
Section 144 Applyed Mumbai : मुंबईत ओमायक्रॉनबाबत निर्बंध अधिक कठोर, आजपासून नवी नियमावली लागू

By

Published : Dec 16, 2021, 7:24 AM IST

Updated : Dec 16, 2021, 11:56 AM IST

मुंबई - राज्यसरकारने ओमायक्रॉनचा चांगलाच धसका घेतला आहे. लोकांना त्याची झळ पोहोचू नये यासाठी नववर्षाच्या जल्लोषावर कठोर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे लोकांना नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करायचे असेल तर आधी दोन व्हॅक्सिनचे डोस घेतलेले असणे बंधनकारक असणार आहे. राज्यात (Omicron) ओमायक्रॉच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मध्यरात्रीपर्यंत मुंबईत कलम (144) लागू करण्यात आले आहे. (Omicron number increasing in Mumbai) 'कोरोनामुळे लोकांकडून योग्य वर्तन न केल्यास कारवाई केली जाईल' असही पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी स्पष्ट केले आहे. सध्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनचा धोका वाढला आहे. त्यामुळे काही निर्बंध असताना लोक अजूनही कोविडचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांनी ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे. (Section 144 applies in Mumbai) आता 31 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी केली आहे. (Omicron in Maharashtra) 16 डिसेंबरपासून मुंबईत नवी नियमावली लागू होणार आहे.

ओमायक्रॉनची राज्यातील परिस्थिती

राज्यात (Omicron variant in maharashtra) ओमायक्रॉनचे २८ रुग्ण आढळून आले होते. काल उस्मानाबाद येथे २, मुंबई येथे १ तर बुलढाणा येथे १ असे चार रुग्ण (New Omicron patients) आढळून आल्याने राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. एकूण ३२ पैकी २५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. मात्र कोरोनाचे सर्वच नियम पाळण्याचे बंधन सर्वांवर आहे.

पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश

मुंबईतील मॉल, हॉटेल, दुकानांमध्ये पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश मिळणार आहे. ( WHO Virus Of Concern ) सार्वजनिक कार्यक्रमात केवळ 50 टक्के उपस्थितीची अट लागू करण्यात आली आहे. मुंबईत आजपासून मुंबई पोलिसांनी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. मॉल, दुकानं, सार्वजनिक वाहतूक इथे केवळ पूर्ण लसीकरण झालेल्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे.

कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना केवळ 50 टक्के उपस्थितीची अट

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पालिकेचा वॉच असणार आहे. 100 भरारी पथकं यासाठी नेमण्यात आली आहेत. प्रत्येक वॉर्डात 2 ते 5 भरारी पथकं नेमून कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, हॉल, पब, पार्ट्यांच्या ठिकाणी पालिकेचे अधिकारी पोलिसांसह सरप्राइज व्हिजिट करणार आहेत. यावेळी मास्क न घातल्यास, गर्दी आढळल्यास रोख दंड किंवा साथरोग कायद्यानुसार कारवाई करणार आहेत. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना केवळ 50 टक्के उपस्थितीची अट ठेवण्यात आली आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर पार्ट्यांसाठी हे निर्बंध लावण्यात आले आहेत. पार्ट्यांना केवळ 50 टक्के उपस्थिती ठेवण्यात येईल.

काय आहेत निर्बंध

  • सर्व व्यक्ती ज्या एखाद्या कार्यक्रमाशी, सेवेशी निगडीत आहेत. आयोजक, सहभागी असणारे, अभ्यागत, पाहुणे, ग्राहक यांचे पूर्णपणे लसीकरण असायला हवे.
  • कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल, कार्यक्रम, मेळावे याठिकाणी आलेल्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण झालेले असावे.
  • अभ्यागत, ग्राहक यांचंही लसीकरण झाले पाहिजे.
  • मुंबईतील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवेने प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण झाले असावे.
  • पूर्ण लसीकरण न झालेल्या व्यक्तींना प्रवास करण्यावर बंदी.
  • महाराष्ट्रात येणाऱ्या किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींचे पूर्ण लसीकरण अथवा ७२ तासांपूर्वी करण्यात आलेली आरटी पीसीआर चाचणी वैध असेल.
  • कोणत्याही कार्यक्रम, स्पर्धा, मेळावे, समारंभ या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. जर एकूण उपस्थित लोकांची संख्या
  • १ हजारापेक्षा जास्त असल्यास स्थानिक प्राधिकरणाला याबाबत माहिती द्यावी लागेल.
Last Updated : Dec 16, 2021, 11:56 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details