मुंबई -बंडखोरी करून शिवसेनेला आव्हान देणाऱ्या नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी रात्री उशिरा गुजरातमध्ये गुप्त भेट झाली. एकनाथ शिंदे आसाममधून विशेष विमानाने एकटेच बडोद्याला गेले. येथे फडणवीस यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेबाबत चर्चा केल्याचे बोलले जाते. अधिकृत सूत्रांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची एकाच आठवड्यात दुसरी भेट असल्याचे समजते.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना शिवसेनेने परत येण्याचे अनेक आवाहने केली. मात्र, एकनाथ शिंदे हे भाजप सोबत युती करण्याच्या मतावर ठाम आहे. गेल्या अडीच वर्षात शिवसेना आमदारांची गळचेपी झाली. अशातच आम्ही हिंदूत्ववादाशी तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी आणि शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत मविआ न ठेवता भाजपशी युती करावी, असा ठराव शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला. मुख्यमंत्र्यांनी तो फेटाळून लावला. शिंदे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे शिवसेना आणि एकनाथ शिंदे घटामध्ये पोचला.