मुंबई -पीएमएलए कोर्टाने मंगळवारी नीरव मोदीचा मेहूणा मैनक मेहता याला दिलासा दिला आहे. मैनक मेहता यांच्या विरोधात असलेले सर्च वॉरंट कोर्टाने रद्द केले आहे. मेहता हे नीरव मोदीची बहिण पूर्वी मेहताचे पती आहे. कोर्टाने मेहता यांना ५० हजार रुपयांचा रोख जामीन भरण्याचे निर्देश दिले आहेत.
नीरव मोदीला दिलासा -
नीरव मोदी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज पीएमएलए कोर्टात मेहता हजर झाले. मेहता यांच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, 'जेव्हा पण ईडीसमोर हजर रहायचे असेल तेव्हा मेहता हजर होतील. यावर कोर्टाने मेहता यांना रोख ५० हजार रुपयांचा जमाती वारंट भरण्याचे निर्देश दिले. मेहता दांम्पत्याविरोधात २०१८मध्ये गैरजमानती वॉरंट जारी केले होते.
हेही वाचा - आयएएस-आयपीएस अधिकारी आधी फडणवीसांची भेट घेतात, त्यानंतर मंत्र्यांवर आरोप केले जातात!