महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ST Buses : एसटी बसला समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा तडाखा; तीन हजार बसचे भविष्य टांगणीला - समुद्र खारे वारे एसटी बस सडल्या

राज्यातील 15 हजार एसटी बसेसपैकी (ST Buses Condition) कोकण विभागातील सुमारे तीन हजार एसटी बसेस समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे सडू लागल्या आहेत. त्यामुळे संप मिटल्यानंतर या बसेस रस्त्यावर धावणार की भंगारात जाणार अशी चर्चा आहे.

st bus
एसटी बस फाईल फोटो

By

Published : Apr 14, 2022, 7:11 PM IST

मुंबई -तब्बल सहा महिने लांबलेल्या एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचे (ST Workers Strike) परिणाम लालपरी सुरू झाल्यानंतर दिसू लागले आहेत. राज्यातील 15 हजार एसटी बसेसपैकी (ST Buses Condition) कोकण विभागातील सुमारे तीन हजार एसटी बसेस समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे सडू लागल्या आहेत. त्यामुळे संप मिटल्यानंतर या बसेस रस्त्यावर धावणार की भंगारात जाणार अशी चर्चा रंगली आहे.

महामंडळात रंगली चर्चा -अगोदरच कोरोनामुळे सतत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मागील दोन वर्षात एसटीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून संपामुळे एसटीचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. सुरू असलेल्या एसटी संपामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. नुकताच न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांची याचिका निकालात काढून 22 एप्रिल 2022 पर्यत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे कर्मचारी कामावर सुद्धा रुजू होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, एसटी महामंडळाच्या राज्यभरात 15 हजार बसेसपैकी सध्या 6 हजार 500बसेस रस्त्यावर धावत आहे. उर्वरित बसेस एकाच ठिकाणी उभे असल्याने एसटीचे टायरवर मोठ्या प्रमाणात प्रेशर येत आहे त्यामुळे अनेक बस गाड्यांचे टायर खराब होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय कोकण विभागातील सुमारे तीन हजार एसटी बसेस समुद्राच्या खाऱ्या वाऱ्यामुळे सडू लागल्या आहेत. त्यामुळे या बसेस संप मिटल्यानंतर रस्त्यावर जाणार की भंगारात जाणार अशी चर्चा रंगली आहे.

दहा हजार बस डेपोत उभ्या-एसटी महामंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अनेक दिवसापासून एसटी बसेस एकाच जागेवर उभ्या राहिल्याने बॅटरी डिस्चार्ज होत आहे. त्यामुळे बॅटरीचे मेंटेनेस वाढले आहे. अनेक दिवसांपासून बसेस एकाच ठिकाणी उभे असल्याने टायरवर मोठ्या प्रमाणात प्रेशर येत आहे. त्यामुळे सगळ्यांचे टायर सुद्धा खराब होण्याचा मार्गावर आहे. मात्र, राज्यातील सर्व आगार प्रमुखांना निर्देश देण्यात आले आहे. गाड्या आगरा बाहेर पडत नसले तरी, दररोज गाड्यांची मुमेंड होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक डेपोतील टेक्निशियन कर्मचारी डेपोत उभ्या असलेल्या गाड्यांच देखभाल करत आहे. साधारणता सध्या दररोज राज्यभरात साडे सहा हजार बसगाड्या रस्त्यावर धावत आहे. उर्वरित 8 हजारपेक्षा जास्त एसटी बसेस अजूनही बस डेपोत उभ्या आहेत.

ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण वाढणार -महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे, यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, संपामुळे राज्यभरातील एसटी बस गाड्या डेपोत अनेक महिन्यापासून उभ्या आहेत. त्यामुळे दृष्टीच्या मोठ्या प्रमाणात एसटीचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायग, मुंबई ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील जवळ जवळ तीन हजार एस टी बसेस समुद्राच्या खाऱ्या वार्‍यांमुळे भंगारात काढण्याची वेळ महामंडळावर आली आहे. कारण समुद्राच्या पाण्यामुळे बस गाड्यांचे स्पेअर पार्ट गंज चढतोय. त्यामुळे बस गाड्यांचे स्पेअर पार्ट खराब होतात. एसटीच्या बसेस जेव्हा पुन्हा समजेना चालवण्याची वेळ महामंडळावर येईल तेव्हा या बसेस ब्रेक डाऊन होण्याचे प्रमाण वाढेल आणि बसेसची कमतरता भासणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने तात्काळ डेपोत उभ्या असलेल्या बसेसची पुरेपूर काळजी घेऊन दुरुस्त करावेत.

ABOUT THE AUTHOR

...view details