मुंबईया महिन्याच्या शेवटी ३१ जुलैला असलेल्या गणेश चतुर्थीसाठी Ganesh Chaturthi अवघ्या काही दिवसांचा अवधी आता शिल्लक राहिला आहे. अशातच मुंबईतील कारखान्यामध्ये गणेशांच्या उंचच्या उंच मूर्ती Tall idols of Ganesha घडवण्यासाठी मूर्तिकारांची Sculptor लगबग सुरू झालेली आहे. यंदा फारच कमी दिवस भेटल्याने त्यातच मजुरांचा तुटवडा असल्याने या मूर्ती घडवणे त्यांच्यापुढे आव्हान आहे.
मूर्तिकारांसाठी आव्हान? 31 जुलैला महाराष्ट्रासाहित देशभर साजरा होणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी Ganesh festival आता फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. अशातच गणेशोत्सवात मुंबईमध्ये विविध रूपांत गणपतीच्या उंचच्या उंच मूर्ती साकारण्यासाठी मुंबई नगरी प्रसिद्ध आहे. त्यातच या विविध रूपातील गणपती साकारण्याच मोठं आव्हान आता मूर्तिकारांसमोर आहे. यंदा राज्यातील नाट्यमय सत्तांतरांचा फटका मूर्तिकारांना सुद्धा बसला आहे. सरकारने फार उशिरा मूर्तीच्या उंचीवरील निर्बंध हटवले असल्याकारणाने अनेक गणेश मंडळांनी उंचच्या उंच मूर्ती मंडपात विराजमान करण्याचा निश्चय केला. त्यातच या मूर्तीची उंची 10 फुटापासून 22 फुटापर्यंत असणार आहे. हा कालावधी कमी असल्याकारणाने मूर्तिकार सुद्धा नाराज झाले असले तरी आता समोर असलेले आव्हान पेलण्यासाठी त्यांनी पूर्ण तयारी केली आहे. मुंबईतील विविध गणेश कारखान्यांमध्ये दिवस रात्र कारागीर मूर्ती साकारण्यामध्ये मग्न झालेले दिसत आहेत.