पालघर- राजकारणाचा मुळ पाया गावातुनच सुरू होतो. गावगाडा चालवणारी ग्रामपंचायत निवडणूकीच्या मुशीतुनच कार्यकर्ते, नेते तयार होतात. त्याच ग्रामपंचायती च्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये 342 ग्रामपंचायती च्या निवडणुका 13 ऑक्टोबर ला ( Palghar Elections news ) होणार आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. युती, आघाडीच्या वरिष्ठ पातळीवरच्या निर्णयाची वाट न बघता, प्रत्येक राजकीय पक्षांनी ऊमेदवारांची चाचपणी, कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे. यावेळी प्रथमच मतदारांकडुन थेट सरपंच निवडला जाणार असुन सरपंचाला विशेषाधिकार दिल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीसाठी जिल्ह्याचे नेते तालुका निहाय बैठका ( Heavy meetings of taluka bearers) घेत आहेत. त्यामुळे महिनाभर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकीचा धुराळा ऊडणार आहे. ( Maharashtra gram panchayat election )
प्रशासकामुळे गावगाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप : पालघर जिल्ह्यातील 473 ग्रामपंचायती मधील 342 ग्रामपंचायतींचे बिगुल वाजले आहे. 21 ते 27 सप्टेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र ऊमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असुन 13 ऑक्टोबर ला मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी कमी अवधीत सर्व प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान राजकीय पक्षांपुढे आहे. यावेळच्या निवडणुकीत मतदारांकडुन थेट सरपंच निवडला जाणार आहे. तसेच गावाचा विकास करण्यासाठी सरपंचाला विकास कामे करण्याचे विशेषाधिकार देण्यात आले आहेत. तसेच थेट ग्रामपंचायती ला विकास निधी ऊपलब्ध होणार आहे. त्यामुळे सरपंच हाच गावचा आमदार बनणार आहे. गेली सात महिन्यापासून जिल्ह्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायती वर प्रशासक आहेत. त्यामुळे गावगाड्याचा विकास खुंटल्याचा आरोप सर्वच स्तरातून होत आहे.
शिंदे गटाची रणनीती अजुनही गुलदस्त्यातच :या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. युती, आघाडीचे निर्णय अजुनही झालेले नाहीत. वरिष्ठांच्या आदेशाची जिल्हा व तालुका पातळीवरचे नेते वाट बघत आहेत. त्यातच राज्यात घडलेल्या सत्ता संघर्ष आणि राजकीय घडामोंडींचा या निवडणुकीवर मोठा परिणाम होणार आहे. राज्यात सत्तेत आल्याने, भाजप ला पुन्हा बळ मिळाले आहे. एकनाथ शिंदे गटाची अजुनही जिल्ह्यात कार्यकारीणी अस्तित्वात नाही. शिंदे गटाची रणनीती अजुनही गुलदस्त्यातच आहे. मात्र, शिवसेनेने निवडणुकीपुर्वीच पदाधिकार्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. अडीच वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस ने आपली पकड निर्माण करण्याचे प्रयत्न केले आहेत.
कोणता पक्ष निर्माण करेल वर्चस्व : शिवसेनेने शिंदे गटाच्या फाळणीनंतर आणि निवडणुक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी च तालुका पातळीवर बैठका घेणे सुरू केले आहे. जुन्या, नव्या शिवसैनिक आणि पदाधिकार्यांना एका व्यासपीठावर आणुन शिवसेना मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. तर भाजपने निवडणुक कार्यक्रम जाहीर होताच तालुका निहाय बैठका घेऊन ऊमेदवारांची चाचपणी व कागदपत्रे गोळा करण्याचे सत्र सुरू केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे यावेळी ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी चांगलीच गाजणार आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांची ही निवडणूक रंगीत तालीम ठरणारी आहे. तसेच कोणता राजकीय पक्ष गावपातळीवर मजबूत आहे हे स्पष्ट होणार आहे. तर कोणता पक्ष सर्वाधिक ग्रामपंचायती वर आपले वर्चस्व निर्माण करून दिवाळीपुर्वी फटाके फोडणार आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
काय असेल शिवसेना आणि भाजपची रणनीती : शिवसेनेने निवडणुकीसाठी संपुर्ण तयारी केली असल्याचे सांगत असताना वैभव संख्ये, शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख म्हणाले की, महाविकास आघाडी होवो अथवा न होवो, शिवसेनेचे सर्व ठिकाणी ऊमेदवार निश्चित करून त्यांचे कागदपत्रे तयार ठेवली आहेत. येत्या दोन दिवसांत वरिष्ठ नेते महाविकास आघाडी बाबत निर्णय घेणार आहेत. शिंदे गटाचा या निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नाही. जिल्ह्यात शिवसेना एक नंबर आहे आणि यापुढेही राहणार आहे. भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील म्हणाले की, भाजप ने सर्व तालुका पातळीवर बैठका घेणे सुरू केले आहे. ऊमेदवारांची चाचपणी स्थानिक पातळीवर घेतली जात आहे. भाजप आणि शिंदे गटाची अजून युती झालेली नाही. युती बाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी तालुका निहाय जबाबदार्या दिल्या आहेत. जास्तीत जास्त ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण करण्याची भाजप ची रणनीती आहे.